अंकोलीचा स्वप्नील पवार आदर्श विद्यार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:21 IST2021-03-21T04:21:23+5:302021-03-21T04:21:23+5:30

कुरूल : अंकोली (ता. मोहोळ) येथील विद्यार्थी स्वप्नील रवींद्र पवार हा पुणे विद्यापीठातील यावर्षीचा आदर्श विद्यार्थी ठरला आहे. तो ...

Ankoli's Swapnil Pawar is an ideal student | अंकोलीचा स्वप्नील पवार आदर्श विद्यार्थी

अंकोलीचा स्वप्नील पवार आदर्श विद्यार्थी

कुरूल : अंकोली (ता. मोहोळ) येथील विद्यार्थी स्वप्नील रवींद्र पवार हा पुणे विद्यापीठातील यावर्षीचा आदर्श विद्यार्थी ठरला आहे.

तो पुणे विद्यापीठाच्या मॉडर्न महाविद्यालय येथे वनस्पतीशास्त्र विभागात तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. दरवर्षी द स्टुडंट ऑफ द ईअरसाठी कॉलेजमधून एका विद्यार्थ्याची निवड केली जाते. यावर्षी आदर्श विद्यार्थी पुरस्कारासाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने पार पडली. यावर्षीच्या पुरस्कारासाठी सोलापूरच्या स्वप्नील पवारची निवड झाली.

या निवडीबद्दल मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. झुंजारराव, उपप्राचार्य चौधरी, वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ. पाटील, डॉ. वायसे, डॉ. बारमुख, विभागप्रमुख पूजा परतणे, मोहोळ पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील, काकासाहेब पाटील, माजी सरपंच नागराज पाटील, सरपंच दीपक गवळी यांनी त्याचे कौतुक केले.

---

२० स्वप्नील पवार

Web Title: Ankoli's Swapnil Pawar is an ideal student