शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Digital Education; अंकोलीचा आॅनलाईन पॅटर्न पोहोचला सिंगापुरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 12:07 IST

चार शिक्षकांचे परिश्रम : पहिली ते चौथीपर्यंतचा अभ्यासक्रम

ठळक मुद्देदररोज सलग पाच ते सहा तास प्रत्येक जण घरीच काम करून अभ्यास तयार करत आहेत.अभ्यासाचे पीडीएफमध्ये रूपांतर केल्याने ते सातासमुद्रापार सिंगापूर येथे पोहोचले

महेश कुलकर्णी 

कुरुल : अंकोली केंद्राच्या जिल्हा परिषद शाळेतील चार शिक्षक एकत्र येत आॅनलाईन अभ्यासक्रम तयार केला आहे. हा पॅटर्न सर्वत्र गाजत  असून त्याचा डंका सिंगापुरात वाजत आहे. 

वरकुटे येथील उपक्रमशील शिक्षक महेश गोडगे हे एकटेच पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यास तयार करत होते. मात्र त्यासाठी खूप वेळ लागत होता़ त्यानंतर सहकारी दीपक पारडे, नेताजी रणदिवे व प्रदीप माळी यांच्याशी चर्चा केली़ या चौघांनी मिळवून अभ्यासक्रम तयार केला़ त्यात प्रदीप माळी यांनी पहिली, नेताजी रणदिवे यांनी दुसरी, दीपक पारडे यांनी तिसरी तर महेश गोडगे यांनी इयत्ता चौथीच्या आॅनलाईन अभ्यासाची जबाबदारी स्वीकारली अन् सुरू झाला टीम अंकोली निर्मित आॅनलाईन अभ्यासाचा नवा पॅटर्न. 

हा अभ्यास पीडीएफ स्वरूपात आहे. ठळक अक्षरात, आकर्षक रंगात, चित्रांसह हा अभ्यास तयार करत आहोत. प्रत्येक इयत्तेच्या घटकनिहाय सोप्या शब्दांत मांडणी केलेल्या या अभ्यासामध्ये स्वनिर्मित यूट्यूबवरील शैक्षणिक व्हिडिओही जोडले आहेत. त्यामुळे मुलांना अवघड घटक देखील चटकन समजू लागला़ या अभ्यासासोबत कार्यानुभव, शारीरिक शिक्षण, योगासने यांचे व्हिडिओ देखील तयार करून या अभ्यासात जोडत असल्याचे त्यांनी सांगितले़ या अभ्यासात शेवटी ते मोबाईल क्रमांक देऊन अभ्यासाबद्दल प्रतिक्रिया मागवितात. त्यामुळे अनेक शिक्षक, पालक तसेच विद्यार्थ्यांच्या फोनद्वारे व मेसेजद्वारे प्रतिक्रिया येत आहेत.

असा चालतो अभ्यासव्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर, ब्रॉडकास्टद्वारे रोज सकाळी हे चौघे हा अभ्यास पाठवितात़ त्यानंतर काही पालक तो अभ्यास इतर ग्रुपवर पाठवितात. असा या आॅनलाईन अभ्यासाचा प्रवास सुरू आहे. हा अभ्यास राज्यभर पोहोचत तर आहेच. याशिवाय या अभ्यासाचे पीडीएफमध्ये रूपांतर केल्याने ते सातासमुद्रापार सिंगापूर येथे पोहोचले आहे. तेथूनही अभ्यासाबद्दलची प्रतिक्रिया आल्याचे महेश गोडगे यांनी सांगितले़

१५ जूनपासून अविरत काम सुरूदररोज सलग पाच ते सहा तास प्रत्येक जण घरीच काम करून अभ्यास तयार करत आहेत. यासाठी स्वत:चा लॅपटॉप, मोबाईल यांसह व्हॉट्सअ‍ॅप, यूट्यूब,  फिल्ममेकर, पिक्सल लॅब, पिक्स आर्ट, इनशॉट आदी अ‍ॅपचा वापर करून आॅनलाईन अभ्यास तयार करीत आहेत. १५ जूनपासून आजवर अविरत या टीमचे कार्य सुरू आहे. या सर्व शिक्षकांचे शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे, गटशिक्षणाधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, माढ्याचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, शिक्षण विस्तार अधिकारी विकास यादव यांनी कौतुक केले़ 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाsingaporeसिंगापूर