शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
3
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
4
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
5
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
6
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
7
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
8
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
9
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
10
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
11
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
12
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
13
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
14
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
15
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
16
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
17
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
18
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
19
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
20
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?

जनावरांच्या छावण्या ३१ आॅगस्टपूर्वी बंद होणार नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 15:27 IST

आदित्य ठाकरे : माढ्यातील जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा

ठळक मुद्देमाढ्यातील शालेय विद्यार्थी शिवराज गायकवाड यांनी दप्तराच्या ओझ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केलीकर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र कर्जमाफी न झालेल्या शेतकºयांनी पदाधिकाºयांशी संपर्क  साधण्याचे आवाहन सुजलाम् सुफलाम्, दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

माढा : दुष्काळाची तीव्रता गंभीर असून, ३१ आॅगस्टच्या अगोदर छावण्या बंद होणार नाहीत, याची काळजी करण्याचे कारण नसल्याचे सांगत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्यातील शेतकºयांना दिलासा दिला आहे.

माढ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बोलताना त्यांनी येथील शेतकºयांना वरील दिलासा दिला़ प्रारंभी वडशिंगे येथील शालेय विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी जलसंधारण मंत्री तानाजीराव सावंत, खा़ ओमराजे निंबाळकर, सचिन आहिर, जिल्हा समन्वयक शिवाजीराव सावंत, झेडपी सदस्य धनंजय सावंत, युवा नेते पृथ्वीराज सावंत, युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश वानकर, नगरसेवक मनोज शेजवाल, जिल्हा अध्यक्ष संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख चरणराज चवरे, तालुकाध्यक्ष मधुकर देशमुख, युवासेनेचे वैभव मोरे, मुन्ना साठे, शंभू साठे, राजेंद्र्र वाल्मिकी, समाधान दास उपस्थित होते.

आदित्य ठाकरे म्हणाले, या यात्रेतून मी मत मागायला आलो नसून जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलोय. तुमच्या स्वप्नातील उद्याचा महाराष्ट्र कसा असावा, हे जाणून घ्यायला आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

माढ्यातील शालेय विद्यार्थी शिवराज गायकवाड यांनी दप्तराच्या ओझ्याबाबत आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. यावेळी लवकरच यावर तोडगा काढण्यासंदर्भात प्रयत्न असणार असल्याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले़

कर्जमाफी नकोय़़क़र्जमुक्ती हवी आहे- कर्जमाफीच्या मुद्यावर भाष्य करताना आदित्य ठाकरे यांनी शेतकºयांना कर्जमाफी नकोय, कर्जमुक्ती हवी असल्याचे म्हणाले़ निवडणुका आल्यावर अनेक पक्ष येतात, वाकून नमस्कार करतात, मते मागतात़ मात्र पाच वर्षे शिवसेना जनतेसोबत कायम राहत असते.  कर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले मात्र कर्जमाफी न झालेल्या शेतकºयांनी पदाधिकाºयांशी संपर्क  साधण्याचे आवाहन यावेळी केले.  सुजलाम् सुफलाम्, दुष्काळमुक्त, बेरोजगारी मुक्त, प्रदूषणमुक्त महाराष्ट्र बनविण्यासाठी शिवसेनेच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सत्तेत असो किंवा नसो़़़ दिलेले वचन शिवसेना पूर्ण करत असून, देश व संपूर्ण महाराष्ट्र भगवा झाला आहे़ यापुढील काळातही भगवा करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयagricultureशेतीFarmerशेतकरीAditya Thackreyआदित्य ठाकरे