अन् चोरीला गेलेला मालट्रक सापडला
By Admin | Updated: June 4, 2014 00:23 IST2014-06-04T00:23:09+5:302014-06-04T00:23:09+5:30
सांगोला : महुद बु॥ (ता. सांगोला) येथून सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता नाट्यमयरित्या चोरीस गेलेला मालट्रक अवघ्या चोवीस तासात मंगळवारी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे पंढरपुरातच सापडला आहे.

अन् चोरीला गेलेला मालट्रक सापडला
सांगोला : महुद बु॥ (ता. सांगोला) येथून सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता नाट्यमयरित्या चोरीस गेलेला मालट्रक अवघ्या चोवीस तासात मंगळवारी ‘लोकमत’मधून प्रसिद्ध झालेल्या बातमीच्या आधारे पंढरपुरातच सापडला आहे. ट्रक सापडल्यामुळे विभुते कुटुंबीयांच्या आनंदाला पारा उरला नाही तर पोलिसांनीही ट्रक सापडल्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. महुद बु॥ (ता. सांगोला) येथील महुद बु॥-दिघंची रोडवरील वर्दळीच्या ठिकाणाहून उभा असलेला (क्र. एम.एच. ४५/०४९२) मालट्रक अज्ञात चोरट्यांनी सोमवारी सकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास पळवून नेला होता. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी दुसर्या दिवशी विभुते कुटुंबीय ट्रकची शोधाशोध करीत असताना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास महुद बु॥ गावचे पोलीस पाटील दादासाो कांबळे यांनी अचानक विभुते यांच्या घरी येऊन तुमचा ट्रक ‘लोकमत’मधील वृत्तामुळे पंढरपुरात सापडला आहे, असा निरोप मिळताच विभुते कुटुंबीयांच्या आनंदाला पारावार उरला नाही. विभुते कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न लावता पंढरपूरकडे धाव घेतली असता आपला मालट्रक सुस्थितीत असल्याचे पाहून आनंद व्यक्त केला.