शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तानवडेंचाही जातीचा दाखला बोगस; सचिन कल्याणशेट्टी शाळेत न जाता उकळतात पगार : शंकर म्हेत्रे यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 12:55 IST

अक्कलकोट काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांची पत्रकार परिषद़ सोलापूर लोकसभेचे उमेदवार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्यावरही केला आरोप

ठळक मुद्देआनंद तानवडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय कोळी हे जयसिद्धेश्वर स्वामींचे हस्तक - शंकर म्हेत्रेआनंद तानवडे यांचाही दाखला बोगस असून, सचिन कल्याणशेट्टी यांनी पाणलोटमध्ये भ्रष्टाचार केला - शंकर म्हेत्रेलिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध करणारे एकमेव महाराज जयसिद्धेश्वर असून, त्यांचा पर्दाफाश लवकरच करणार - शंकर म्हेत्रे

दुधनी : जयसिद्धेश्वर स्वामींनी मागासवर्गीय समाजाचा हक्क हिसकावून बोगस जातीच्या दाखल्याच्या आधारे निवडणूक लढवित आहेत. विरोधक या गोष्टीचा धसका घेऊन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी खोटी बातमी पसरवून सामाजिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. आनंद तानवडे यांचाही दाखला बोगस असून, सचिन कल्याणशेट्टी यांनी पाणलोटमध्ये भ्रष्टाचार केला आहे. शाळेत न जाता लाखो रूपये पगार उकळतात, असा आरोप काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी आजपर्यंत मागासवर्गीय समाजाला आपल्या मठात प्रवेश नाकारला. ते महाराज बोगस जातीचा दाखला मिळवून निवडणूक लढवित आहेत. त्याबद्दल लिंगायत समाजात तीव्र नाराजी आहे. विशेषत: लिंगायत स्वतंत्र धर्माला विरोध करणारे एकमेव महाराज जयसिद्धेश्वर असून, त्यांचा पर्दाफाश लवकरच करणार आहे.

आनंद तानवडे, सचिन कल्याणशेट्टी, संजय कोळी हे जयसिद्धेश्वर स्वामींचे हस्तक आहेत, असा आरोपीही शंकर म्हेत्रे यांनी केला.शंकर म्हेत्रे म्हणाले, लोकमंगल दूध भुकटी प्रकरणातले आरोपी व शाळेत एकदाही न जाता दरवर्षी लाखो रुपये पगार उचलणारे सचिन कल्याणशेट्टी शाळेत शिक्षक आहेत. कल्याणशेट्टी यांनी किती पिढ्या बरबाद केल्या, याचे आत्मचिंतन करावे, असा प्रश्न म्हेत्रे यांनी उपस्थित केला. यावेळी माजी सभापती राजकुमार लकाबशेट्टी, मंगला पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणारसचिन कल्याणशेट्टी यांनी पाणलोट क्षेत्रात भ्रष्टाचार केला आहे. त्याबाबत सीआयडी चौकशीची मागणी करणार असल्याचे कापसे यांनी सांगून काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष शंकर म्हेत्रे यांच्याबाबत कल्याणशेट्टी, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी अवमानकारक भाषा वापरल्याने त्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्यात येणार असल्याचेही शहराध्यक्ष भीमा कापसे यांनी सांगितले.

 मी एक भाजप कार्यकर्ता आहे. शंकर म्हेत्रे यांनी जे बोलले आहे, त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे, ते पहावे. त्यांच्याबरोबर माझी दुश्मनी नाही. भाजपचे उमेदवार जयसिद्धेश्वर महास्वामी विरोधात बोलल्याबद्दल निषेध व्यक्त करतो.-आनंद तानवडे, पक्षनेता, जिल्हा परिषद, सोलापूर

त्यांच्यात खरंच हिम्मत असेल तर माझ्यासह पालकमंत्र्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करून दाखवावाच. नाही त्यांचे धिंडवडे नाही काढले तर माझं नाव मी नक्कीच सांगणार नाही.-सचिन कल्याणशेट्टी, तालुकाध्यक्ष, भाजप, अककलकोट

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढा