शौचाला जाताना सुसाट दुचाकी धडकली अन् आजोबा गंभीर, थेट रुग्णालयात
By विलास जळकोटकर | Updated: August 17, 2023 19:36 IST2023-08-17T19:36:36+5:302023-08-17T19:36:46+5:30
जखमी वृद्ध हे बुधवारी पोलीस मुख्यालयासमोरील रस्ता पार करुन शौचाला जात होते

शौचाला जाताना सुसाट दुचाकी धडकली अन् आजोबा गंभीर, थेट रुग्णालयात
सोलापूर : सकाळच्या वेळी रस्ता ओलांडून शौचाला जात असलेल्या वृद्धाला रोडवरुन सुसाट येणाऱ्या ७३ वर्षीय आजोबाला जोरदार धडक दिली. यात ते रस्त्यावर कोसळले. त्यांना गंभीर मार लागला. हरिश्चंद्र नागनाथ चव्हाण (वय- ७३, रा. राहूल गांधी झोपडपट्टी, सोलापूर) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.
ही घटना पोलीस मुख्यालय ग्रामीण कार्यालयाच्या रोडवर ही घटना घडली. यातील जखमी वृद्ध हे बुधवारी पोलीस मुख्यालयासमोरील रस्ता पार करुन शौचाला जात होते. समोरुन सुसाट येणाऱ्या दुचाकीस्वाराचे नियंत्रण सुटले. दुचाकी जोरदार धडकल्याने हरिश्चंद्र चव्हाण हे रोडवरच कोसळले. यात त्यांच्या जिथेला, डोक्याला, गुप्तांगास गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. वय अधिक असल्याने प्रकृती गंभीर असून, स्थिर आहे. ते शुद्धीवर असल्याचे रुग्णालय सूत्रांनी सांगितले. डॉ. हेमंत त्यांच्यावर उपचार करीत आहेत. सिव्हील पोलीस चौकीत या घटनेनी नोंद झाली आहे.