३० हजार ३०४ बालकांना दिली पोलिओची मात्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:47 IST2021-02-05T06:47:30+5:302021-02-05T06:47:30+5:30
पल्स पोलिओ दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयामार्फत शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयासह बस स्थानक, रेल्वे ...

३० हजार ३०४ बालकांना दिली पोलिओची मात्रा
पल्स पोलिओ दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालयामार्फत शून्य ते ५ वर्ष वयोगटातील बालकांना पोलिओची मात्रा देण्यासाठी ग्रामीण रुग्णालयासह बस स्थानक, रेल्वे स्टेशन, शाळा अशा २२ बुथवर ग्रामीण रुग्णालयाच्या ६४ कर्मचाऱ्यांच्या मदतीने शहरातील ३ हजार ८०६ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली, तर सांगोला तालुक्यातील ६ प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व २७० बुथवर ५४० कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून २६ हजार ४९८ बालकांना पोलिओची मात्रा देण्यात आली.
आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसभर मुख्य चौक, रेल्वे स्टेशन व बसस्थानकासह विविध बुथवरून पोलिओची मात्रा देत पल्स पोलिओ दिनाचे महत्त्व पटवून दिले. शून्य ते ५ वर्ष वयोगटातील कोणताही बालक पोलिओच्या डोसपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेत विविध बुथवर अधिकाऱ्यांनी पाहणी केली. पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका, आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, सुपरवायझर यांनी परिश्रम घेतले.