शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

सोलापूर जिल्ह्यात कृषीपंपाची तब्बल ४२४ कोटींची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 3:23 PM

सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे

ठळक मुद्देजिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदारथकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना थकबाकी वाढत राहिली तर त्याचा वीजवितरण सेवेवर परिणाम होऊ शकतो

आप्पासाहेब पाटीलसोलापूर दि २ : सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० थकबाकीदार ग्राहकांपैकी ६४ हजार ५३१ कृषिपंप ग्राहकांनी नवीन वीजजोडणी घेतल्यापासून एकही बिल भरलेले नाही. त्यांच्याकडे ४२४ कोटी २८ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकीदार शेतकºयांना दिलासा देण्यासाठी 'मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना - २०१७' जाहीर करण्यात आली आहे. याचा कृषिपंप लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.          अनेकदा आवाहन करूनही कृषिपंप वीजग्राहक वीजबिल भरत नसल्याने बारामती मंडलाची थकबाकी दिवसेंदिवस वाढतच आहे. जिल्ह्यातील ३ लाख ४४ हजार ४७० कृषिपंप ग्राहकांकडे २ हजार ३७० कोटी ५१ लाख रुपये थकबाकी आहे. आधीच महावितरण आर्थिक संकटात सापडली आहे. महावितरणची थकबाकी अशीच वाढत राहिली तर त्याचा वीजवितरण सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे महावितरणला नाइलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घ्यावी लागते.          सोलापूर जिल्ह्यातील एकदाही वीजबिल न भरणाºया कृषिपंप ग्राहकांमध्ये माळशिरस तालुक्यातील ५ हजार ८५० ग्राहकांकडे ३६ कोटी ४८ लाख, बार्शी तालुक्यातील ७ हजार ३४८ ग्राहकांकडे ५० कोटी २७ लाख, करमाळा तालुक्यातील ७ हजार ५०७ ग्राहकांकडे ६५ कोटी ९ लाख, माढा तालुक्यातील ११ हजार ४६७ ग्राहकांकडे ८६ कोटी १९ लाख, मंगळवेढा तालुक्यातील ४ हजार २२८ ग्राहकांकडे १६ कोटी ९४ लाख, पंढरपूर तालुक्यातील ६ हजार ६१४ ग्राहकांकडे ४१ कोटी ९८ लाख, सांगोला तालुक्यातील ४ हजार ६८५ ग्राहकांकडे २२ कोटी ४७ लाख, अक्कलकोट तालुक्यातील ३ हजार ८१२ ग्राहकांकडे २५ कोटी ५४ लाख, मोहोळ तालुक्यातील ६ हजार ७०१ ग्राहकांकडे ४६ कोटी १२ लाख, उत्तर सोलापूर तालुक्यातील १ हजार ९७५ ग्राहकांकडे ९ कोटी ७२ लाख तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील ४ हजार ३४४ ग्राहकांकडे २३ कोटी ४८ लाख रुपये थकबाकी आहे. --------------------------------     तीन वर्षांत ७ हजारांहून अधिक जोडण्या   मागील तीन वर्षांचा विचार केला तर सोलापूर जिल्ह्यात महावितरणच्या वतीने कृषिपंपांना विक्रमी वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये २०१५-१६ या आर्थिक वर्षात ५ हजार ८९४ नवीन कृषिपंप जोडण्या देण्यात आल्या. २०१६-१७ या आर्थिक वर्षात १ हजार ४९ तर २०१७-१८ या चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ७७५ कृषिपंपांना वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.