शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

अमोल शिंदे सोलापूर महापालिकेचे नवे विरोधी पक्षनेते; महापालिकेत मोठे शक्ती प्रदर्शन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 21:33 IST

महेश कोठे यांच्याकडून घेतला पदभार; सर्वपक्षीय नेत्यांची होती हजेरी

सोलापूरसोलापूर महानगरपालिकेच्या विरोधीपक्षनेतेपदी अखेर महेश कोठे समर्थक अमोल शिंदे विराजमान झाले. याबाबतच्या निवडीचे पत्र शिवसेनेच्यावतीने सोमवारी महानगरपालिकेस देण्यात आल्यानंतर माळवते विरोधीपक्ष नेते महेश कोठे यांच्याकडून पदभार घेताच शिंदे समर्थकांनी पालिकेत दिवाळी साजरी केली. गुलालाची मुक्त उधळण करत फटाके फोडण्यात आले.  विरोधी पक्षनेता यांच्या दालनात झोलेल्या या सोहळ्यात नुतन विरोधी पक्षनेते अमोल शिंदे यांनी शह पाणी पुरवठा, रस्ते शहरातील मुलभुत सुविधा सोडवण्यासाठी सर्व पक्षांना सोबत घेऊन काम  करण्याचे आश्‍वासन शहर वासियांना दिले. 

 पालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी अमोल शिंदे यांची नियुक्ती करावी असे पत्र शिवसेनेच्या नगरसेवकांनी विभागीय आयुक्तांना दिले होते. सोमवारी शिंदे यांच्या निवडीचे पत्र सत्ताधारी आणि पालिका प्रशासनास प्राप्त झाले. सोमवारी अमोल शिंदे यांनी पालिकेत येवून विरोधी पक्षनेतेपदाचा पदभार घेतला. माळवते विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्याकडून अमोल शिंदे यांनी पदभार घेतला. मंगळवेढा तालमीचा युवा कार्यकर्ता पालिकेचा विरोधी पक्षनेता झाल्यानंतर पालिकेच्या आवारात शिंदे समर्थकांनी फटाक्याची आतषबाजी करत गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली.    यावेळी पुरूषोत्तम बरडे,  प्रकाश वाले, चेतन नरोटे,गणेश वानकर,संतोष पवार,दिलीप कोल्हे आदींची य भाषणे झाली. सर्वांनी शिंदे यांना शुभेच्छा देत भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी अमोल शिंदे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम , मावळेत विरोधी पक्षनेते महेश कोठे ,शिवसेना जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम बरडे, कॉंग्रेसचे शहरअध्यक्ष प्रकाश वाले , राष्ट्रवादीेचे शहर कार्याध्यक्ष संतोष पवार, गटनेते चेतन नरोटे, आनंद चंदनशिवे, गटनेते किसन जाधव,तौफिक शेख, नगरसेवक देवेंद्र कोठे, प्रथमेश कोठे, विनायक कोंड्याल, गणेश वानकर, विनोद भोसले, उमेश गायकवाड ,  संतोष भोसले सारिका पिसे, कुंमूद अंकाराम, स्मार्ट सिटीचे त्र्यंबक ढेगळे पाटील, उपायुक्त धनराज पांडे, संकेत पिसे, यांच्यासह शिवसेना पदाधिकारी शिंदे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाPoliticsराजकारण