मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

By Appasaheb.patil | Updated: January 31, 2023 11:26 IST2023-01-31T11:26:34+5:302023-01-31T11:26:54+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

Amit Thackeray of MNS will interact with students in Solapur on Friday | मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

मनसेचे अमित ठाकरे शुक्रवारी सोलापुरात, विद्यार्थ्यांशी संवाद साधणार

सोलापूर :

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे शुक्रवार, दि. ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर शहरातील व जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधणार असून, त्यांचे प्रश्न जाणून घेणार असल्याचे सांगण्यात आले.

विद्यार्थी सेनेचे अध्यक्षपद स्वीकारल्यापासून अमित ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या प्रथमच दौऱ्यावर अमित ठाकरे सोलापूर जिल्ह्याच्या प्रथमच दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, अमित ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख ,विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, उपजिल्हाध्यक्ष सत्तार सय्यद, जिल्हा सचिव अभिषेक रंपुरे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, राहुल पाटील, पवन देसाई आदी तयारीत गुंतले आहेत. संवाद दौऱ्यात सोलापूर शहर व जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आव्हान जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर यांनी केले आहे.

Web Title: Amit Thackeray of MNS will interact with students in Solapur on Friday