शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

निवडीमध्ये आरक्षण नियमांची सुधारणा झाली; सोलापुरातील दोनशेहून अधिक तरूणांना नोकरी मिळाली

By appasaheb.patil | Updated: March 21, 2023 15:23 IST

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामधील नॅशनल हेल्थ मिशन व १५ वित्त आयोगाची भरती प्रक्रिया पार पडण्यात आली होती.

सोलापूर : चुकीचे आरक्षण नियमांमध्ये दुरूस्ती करून  सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने नव्याने उमेदवारांच्या भरतीची नवीन यादी प्रसिध्द केल्याने दोनशेहून अधिक तरूणांना नोकरी मिळाली. या निवडीचे नियुक्ती पत्र तरूणांना वाटप करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्यामधील नॅशनल हेल्थ मिशन व १५ वित्त आयोगाची भरती प्रक्रिया पार पडण्यात आली होती. त्यामध्ये स्टाफ नर्स एमपीडब्ल्यू वैद्यकीय अधिकारी लॅब टेक्निशियन ई पदाची जाहिरात निघाली होती. सदर पदाची परीक्षा घेण्यात आली होती व त्यानुसार निवड प्रक्रिया जाहीर केली त्या निवड प्रक्रियेमध्ये आरक्षणाच्या नियमाचे उल्लंघन करण्यात आले होते, त्यावर तात्काळ स्थगिती येऊन नव्याने निवड यादी प्रसिद्ध करण्याची मागणी बसपाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे नवीन यादी प्रसिद्ध करण्यात आली.

मागील दोन महिन्यात प्रवीण कांबळे यांनी अभ्यासपूर्वक मांडणी करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे, त्याला अखेर यश आले सदर निवड प्रक्रियेमध्ये एससी, एसटी, ओबीसी, एनटी, ईडब्ल्यूएस असे अनेक उमेदवार बाहेर पडलेल्यांना नोकरी मिळाली. त्यांना नियुक्ती पत्रांचेही वाटप करण्यात आले. हे काम यशस्वी होण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश महासचिव आप्पासाहेब लोकरे यांचे सहकार्य लाभले. यासाठी बहुजन समाज पार्टीचेचे प्रविण कांबळे यांनी पाठपुरावा केला होता.