शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हातावर पोट असणाºया कामगारांनी दिले एक दिवसाचे वेतन आंबेडकर जयंतीसाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 15:27 IST

भीम जयंतीची तयारी...परंपरा सोलापुरी... डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्यांचा सामाजिक उपक्रम

ठळक मुद्देजानेवारीपासून एप्रिलपर्यंत हे कार्यकर्ते आठवड्यातील एका दिवसाचे उत्पन्न फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी ठेवतात.साडेतीन महिन्यांचे उत्पन्न साधारणत: दोन ते अडीच लाख रूपये जमा होतात

संताजी शिंदे 

सोलापूर : धाकटा राजवाडा कुंभारवेस येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आठवड्यातील कामाच्या एक दिवसाचा पगार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवासाठी जमा करून साजरी करीत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२८ व्या जयंतीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. शहरातील अनेक उत्सव मंडळे व सामाजिक संस्थांच्या माध्यमातून भव्य आणि दिव्य अशी जयंती साजरी केली जाते. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिष्ठापना केली जाते. १४ एप्रिलनंतर येणाºया रविवारी शहरातून मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढली जाते. 

दरम्यान, विविध मंडळांच्या वतीने सामाजिक कार्यक्रम व उपक्रम राबविले जातात. धाकटा राजवाडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने वर्गणीवर जास्त भर न देता काम करणाºया तरूणांच्या उत्पन्नातून जयंती साजरी केली जाते. संस्थेकडे २५0 कार्यकर्ते असून, हे सर्वजण दोरी करणे, मंगळवार बाजारात व्यापार करणे आदीकामे करतात.

जानेवारीपासून एप्रिलपर्यंत हे कार्यकर्ते आठवड्यातील एका दिवसाचे उत्पन्न फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी ठेवतात. एक दिवसाचे जे काही उत्पन्न असेल ते महिनाअखेर संस्थेकडे जमा करतात. साडेतीन महिन्यांचे                    उत्पन्न साधारणत: दोन ते अडीच लाख रूपये जमा होतात. या आलेल्या पैशातून संस्थेमार्फत  विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. मिरवणुकीच्या दिवशी समाजप्रबोधनावर आधारित   देखावा सादर करीत मिरवणूक काढली जाते. उत्सवात धाकटा राजवाडा येथील लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा सहभाग असतो. 

शिक्षण घेत काम करणारा तरूण वर्ग...- काम करणाºया तरूणांमध्ये अनेक तरूण हे शिक्षण घेत आहेत. ११ वीपासून पदवीच्या तृतीय वर्षापर्यंत शिक्षण घेणारी तरूण मुले काम करतात. न लाजता ही तरूण मुले काम करीत असतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला समाज घडविण्यासाठी काम करीत ही मुले शिक्षण घेत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे समाजाचाच नव्हे तर संपूर्ण बहुजनांचा उद्धार झाला़ त्यांची जयंती जीव की प्राण समजली जाते. तरूणांसाठी एप्रिल महिना हा उत्सवाचा, आनंदाचा आणि दिवाळीसारखा असतो. 

दलित व बहुजन समाज शिकावा, तो मुख्य प्रवाहात यावा हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून आयुष्यभर चळवळ केली. समाजाला न्याय मिळवून दिला़ त्यांच्या उपकाराची उतराई समाज कधीही करणार नाही.त्यांची जयंती आमच्यासाठी दिवाळी आहे.- सूरज गायकवाडसंस्थापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सामाजिक संस्था.

टॅग्स :SolapurसोलापूरDr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती