शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 14:20 IST

मनीषा वापरत असलेला संगणक जप्त केला असून, त्यामधून मिळणाऱ्या दस्तऐवजांतून आणखी काही धागेदोरे मिळाल्यास त्यावर अधिक विचार होऊ शकतो.

सोलापूर : विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये जप्त केलेल्या मोबाइलच्या कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आल्यास तपासाला गती मिळू शकते. यासाठी न्यायालयीन कोठडीतील मनीषाला पुन्हा पोलिस कोठडी मिळवून तपास करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

मनीषा वापरत असलेला संगणक जप्त केला असून, त्यामधून मिळणाऱ्या दस्तऐवजांतून आणखी काही धागेदोरे मिळाल्यास त्यावर अधिक विचार होऊ शकतो. घटनास्थळावरून पोलिसांनी डॉक्टरांचे रक्ताचे डाग असलेले कपडे, टॉवेल, नॅपकीन, जिवंत काडतूस, ओढलेल्या १९ सिगारेट्स, बुलेटमधील शिसे, बुलेटच्या वरील आवरण, पिस्टल फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले असून, त्या रिपोर्टवरही अवलंबून आहे. याकडेही लक्ष असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

तपासात काय मिळाले? डॉक्टरांच्या बेडरूममधून ७० हजार रुपयांचा काळ्या रंगाचा मोबाइल, ग्रे कलरचा ६० हजारांचा दुसरा मोबाइल, एक पेन ड्राइव्ह, डॉक्टरांच्या नावे असलेला शस्त्र परवाना याशिवाय मनीषाने डॉ. आश्विन, डॉ. शिरीष वळसंगकर, साक्षीदार डॉ. उमा वळसंगकर यांना पाठवलेल्या ई-मेलची छायांकित प्रत जप्त केली. या अनुषंगाने तपास सुरू असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

व्हिसेरा रिपोर्टला उशीर?शवविच्छेदनानंतर व्हिसेरा राखून ठेवण्यात आला आहे. तो पुण्याच्या प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आल्याचे यापूर्वीच पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा व्हिसेरा मिळण्यास ४५ दिवसांपेक्षा अधिक काळ लागू शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

अनुत्तरीत प्रश्न

- मनीषाचा संगणक जप्त करायला उशीर झाला का?- मृतदेह लगेचच शासकीय रुग्णालयाकडे का नेला नाही?- डॉक्टरांनी मृत्युपत्र का बदललं, या घटनेशी त्याचा संबंध होता काय?- डॉ. आश्विन यांच्या जबाबातून कोणती माहिती पुढे आली?

टॅग्स :Solapurसोलापूर