शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शासन चालविण्याचा अनुभव नसलेले भाजप सरकार, पृथ्वीराज चव्हाण यांचा भाजप सरकारवर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 15:21 IST

मंगळवेढा : ' सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात ...

ठळक मुद्दे मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागतआगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल - पृथ्वीराज चव्हाणनोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे - पृथ्वीराज चव्हाण

मंगळवेढा : 'सरकारमध्ये बसलेल्या लोकांना शासन चालवण्याचा अनुभव नाही. कुठलाही विचार न करता निर्णय घेतले जातात आणि लोकांनी विरोध केल्यावर निर्णय मागे घेतले जातात त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार आणावे लागेल असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले

 मंगळवेढा तालुका काँग्रेस च्या वतीने जनसंघर्ष यात्रेचे स्वागत करण्यात आहे त्यांनतर बाजार मैदानात सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर व्यासपीठावर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आ भारत भालके, आ रामहरी रुपनवर, आ विश्वजित कदम, जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, नगराध्यक्ष अरुणा माळी, उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, सुरेश कोळेकर, मारुती वाकडे, नगरसेवक राहुल सांवजी, महेश दत्तू,भारत बेदरे, दयानंद सोनगे, संतोष सोनगे, मल्लिकार्जुन बिराजदार आदी उपस्थित होते 

राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, आ भालके यांच्या प्रयत्नातून ३५ गावची उपसा सिंचन योजना व ४० गावची पाणीपुरवठा योजना झाली मात्र सध्या च्या सरकार ने ३५ गावच्या योजनेसाठी निधी दिला नाही ही योजना काँग्रेस सरकार च पूर्ण करेल . या सरकारची धोरणे राज्यातल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताची नाहीत तर फक्त देशातल्या मुठभर उद्योगपतींच्या हिताची आहेत. नोटाबंदीसारखा निर्णय घेऊन सरकारने अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले आहे त्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न गंभीर झाला आहे. सर्वसामान्यांचे अच्छे दिन आणायचे असतील तर भाजप सरकार घालवून काँग्रेसचे सरकार आणावे लागेल,'' असे चव्हाण म्हणाले.

टॅग्स :SolapurसोलापूरCongress Jan Sangharsh Yatraकाँग्रेस जनसंघर्ष यात्राPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणBJPभाजपाGovernmentसरकार