क्र ॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील

By Admin | Updated: February 19, 2017 16:38 IST2017-02-19T16:38:58+5:302017-02-19T16:38:58+5:30

क्र ॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील

All parties will try to prevent cross-voting | क्र ॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील

क्र ॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील

क्र ॉस व्होटिंग रोखण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील
सोलापूर : अनेक प्रकारचे अनुभव, समस्या, प्रश्नावली घेऊन निघालेल्या महापालिका निवडणुकीत बहुतांश पक्षांना ‘क्रॉस व्होटिंग’चा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे़ यावर सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रयत्न आणि मतदारांचे प्रबोधन केले जात असल्याचे प्रचारादरम्यान दिसून येत आहे़ अनेक पक्षप्रमुखांनी याची खबरदारी घेतली आहे़ काही अल्पसंघटित, प्रादेशिक पक्षांना याचा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे़
जागा वाटपावरून सेना-भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी यांची युती तुटली़ त्यामुळे या प्रमुख पक्षांबरोबर इतर घटक पक्षांचेही उमेदवार केवळ रिंगणातच उतरले नाहीत तर ते जोर लावून लढत देत आहेत. राष्ट्रवादी, मनसे, एमआयएम या पक्षांना अनेक प्रभागातून वजनदार, प्रभाव पाडणारे उमेदवार मिळालेले नाहीत़ त्यामुळे तेथे त्यांचे उमेदवारच नाहीत़ परिणामत: अनेकांची कोंडी सुटली आहे़ अशा प्रभागात ज्या पक्षाचा उमेदवारच नाही किंवा पुरस्कृत उमेदवाराला वेगळेच चिन्ह अशा अनेक तांत्रिक दोषातून ‘क्रॉस व्होटिंग’ होऊ शकते़ याचा फ टका पक्षांना बसण्याची शक्यता ओळखून पक्षप्रमुखांनी पदयात्रा काढणाऱ्या उमेदवार, कार्यकर्त्यांकडून मतदारांचे प्रबोधन सुरू केले आहे़ मतदान नेमके कसे करायचे, ईव्हीएम मशीनवर आपल्या पक्षाचे उमेदवार नेमक्या कोणत्या क्रमांकावर आहेत, हे दर्शविणारी पत्रके दररोज वाटली जात आहेत. याशिवाय कार्यकर्त्यांनाही प्रशिक्षित केले जात आहे.
—————
एका मतदाराला लागेल २-५ मिनिटांचा वेळ
युती न झाल्याने उमेदवारांची संख्या वाढली़ परिणामत: मशीनवरच्या चिन्हांची संख्या वाढणाऱ अनेकांच्या मनात पक्षीय उमेदवाराचे चिन्ह आणि अपक्षाचे चिन्ह याबाबत गोंधळ होणार आहे़ जर तीनच उमेदवारांना मतदान करून बाहेर पडाल तर ते मतदानच पूर्ण होणार नाही़ किमान चार उमेदवारांना समजून घेऊन, त्यांची चिन्हे समजून घेऊन मतदान करण्यासाठी किमान २ ते ५ मिनिटांचा वेळ लागेल, असा अंदाज सर्वच पक्षांनी बांधला आहे. अशाप्रकारे तासाभरात केवळ २२ ते २५ मतदारांचे मतदान होईल काय? याबाबत भीती व्यक्त होत आहे. असे जर झाले तर उर्वरित मतदारांना मतदानच करता येणार नाही, वेळही शिल्लक राहणार नाही, मशीन रिकामी दिसणार नाही़ तसेच दुपारी २ ते सायंकाळी ४ या वेळेत ऊन असल्याने अनेक मतदार बाहेर पडणार नाहीत. परंतु सायंकाळी चारनंतर मतदान केंद्रावर गर्दी होणार आहे आणि अनेक ांना मतदानाअभावी अर्थात वेळेअभावी केंद्राच्या बाहेर यावे लागणार आहे़ तसेच दुसरीकडे यंदा नव्या मतदारांची संख्या वाढली असल्याने नियोजित वेळ कमी पडतोय की काय? अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.
---------------------
केवळ उमेदवाराची ओळख करून न देता चिन्हाला पाहून मतदान करा़ चिन्हाला मतदान म्हणजेच पक्षाच्या उमेदवाराला मतदान, अशा प्रकारचे प्रबोधन कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांमधून घडवून आणतोय़ कार्यकर्ते अशा प्रबोधनाचे काम प्रामाणिकपणे करीत आहेत़ याबाबत गोंधळ होणार नाही़
- प्रा़ अशोक निंबर्गी
शहराध्यक्ष, भाजपा
——----------------
मतदारांना मशीनची प्रतिकृती दाखवून प्रबोधन करतोय़ जिथे तीनच उमेदवार आहेत, चौथ्या ठिकाणच्या पुरस्कृत उमेदवाराचे चिन्ह समजावून सांगतोय़ उमेदवारांची वाढलेली संख्या, चिन्ह आणि उमेदवार यांच्यातील गोंधळ यामुळे पॅनलचे नुकसान होऊ शकते़ सुशिक्षित मतदारही गोंधळून जाणार आहेत.
- कोमारू सय्यद
जनरल सेक्रेटरी, एमआयएम़

Web Title: All parties will try to prevent cross-voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.