शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरातील सर्वच अपार्टमेंट प्रकल्प कायदेशीर; जमीनही फ्लॅटधारकांच्याच मालकीची

By appasaheb.patil | Updated: October 26, 2022 14:30 IST

क्रेडाईचे म्हणणे; सोलापुरातील रिअल इस्टेटचे व्यवहार पारदर्शक

 

सोलापूर : महाराष्ट्रात महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅट ॲक्ट १९६३ व महाराष्ट्र अपार्टमेंट ओनरशिप ॲक्ट १९७० हे दोन्ही कायदे अस्तित्वात आहेत. पुणे, मुंबई विभाग वगळता, संपूर्ण महाराष्ट्रात १९७०च्या कायद्याप्रमाणे अपार्टमेंट बांधले जातात व त्याची विक्री केली जाते. सोलापुरात ही याच कायद्यांतर्गत अपार्टमेंट व्यवसाय केला जातो. सोलापुरातील सर्वच अपार्टमेंट प्रकल्प कायदेशीरच आहेत, जमीनही फ्लॅटधारकांच्या मालकीचीच असल्याचे म्हणणे क्रेडाई संघटनेने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रात १९६३ व १९७० हे दोन्ही कायदे अस्तित्वात असून सोलापूरात बहुतांश विकासक १९७० घ्या कायद्यातील तरतुदीनुसार व्यवसाय करतात. १९७० च्या तरतूदी प्रमाणे प्रत्येक अपार्टमेंट धारकाला स्वतंत्र व प्रत्यक्ष मालकी हक्क प्राप्त होतो... मात्र १९६३ च्या तरतूदी प्रमाणे मालकी हक्क सोसायटीच्या नावावर असतो व फ्लॅट धारक हा सभासद म्हणजेच भोगवटादार असतो. म्हणजेच अप्रत्यक्ष धारक असतो. सोलापुरात आत्ताशी दोन अपार्टमेंट इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाला आहे. त्यासाठी विकसकाच्या संमतीची आवश्यकता भासली नाही. आणखी बऱ्याच जुन्या इमारतींचा पुनर्विकास द्रुष्टीपथात आहे. विनाकारण लोकांमध्ये गैरसमज पसरविण्याचे थांबविण्यात यावे असेही मत क्रेडाईचे माजी अध्यक्ष राजेंद्र कासवा यांनी व्यक्त केेले आहे.-----------

पुणे, मुंबई व्यतिरिक्त सोलापूर आणि महाराष्ट्रातील इतर शहरांमध्ये महाराष्ट्र अपार्टमेंट मालकी सदनिका अधिनियम १९७० नुसार काम केले जाते. पुणे, मुंबईच्या तुलनेत सोलापुरातील सर्व प्रकल्प कायदेशीर आहे, जमीनही फ्लॅटधारकांच्या नावावर आहे.

- सुनील फुरडे, क्रेडाई, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य.

---------

१९७० कायद्याप्रमाणे घोषणापत्र करणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे, सोलापुरातील ९० टक्के बिल्डरांनी तसे काम करून ते घोषणापत्र उपनिबंधकांकडे सादर केल्यानंतर, जो तो प्लॅटधारक जमिनीचा मालक आपोआप होतोच. त्याला वेगळे कन्व्हेयन्स डीड करण्याची गरज नाही.

- ॲड.रघुनाथ दामले, कायदेशीर तज्ज्ञ, सोलापूर.

----------

सध्याच्या काळात काही विधिज्ञांकडून फ्लॅट ॲक्ट १९६३ व अपार्टमेंट ॲक्ट १९७० च्या अनुषंगाने जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा उद्योग सुरू आहे. अर्थात त्यामागचे कारण स्पष्ट आहे. त्यातच काही शासकीय अधिकारी पण दोन्ही कायद्यांचा अभ्यास न करता त्याला दुजोरा देत आहेत. १९७० प्रमाणे प्रत्येक अपार्टमेंट धारकाला अपार्टमेंटचे क्षेत्राच्या अनुषंगाने एकूण अनुज्ञेय बांधकाम क्षेत्राच्या प्रमाणाशी हिश्शेराशीने जमिनीतील मालकी हक्क प्राप्त होतो.

- राजेंद्र कासवा, माजी अध्यक्ष, क्रेडाई.

टॅग्स :SolapurसोलापूरHomeसुंदर गृहनियोजन