अकलूज गोळीबार प्रकरण; नाना आसबे यांचा मृत्यू
By Admin | Updated: January 28, 2017 03:48 IST2017-01-28T03:48:50+5:302017-01-28T03:48:50+5:30
संग्रामनगर-अकलूज येथे २९ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी नानासाहेब आसबे यांचा गुरुवारी

अकलूज गोळीबार प्रकरण; नाना आसबे यांचा मृत्यू
अकलूज (सोलापूर) : संग्रामनगर-अकलूज येथे २९ डिसेंबर २०१६ रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणातील गंभीर जखमी नानासाहेब आसबे यांचा गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मृत्यू झाला़ हल्लेखोर आरोपींवर आता ३०२ चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आसबे हे संग्रामनगर येथे आपल्या मित्रांसोबत बोलत उभे असताना मोटरसायकलवरून आलेल्या देवा उर्फ परमेश्वर जाधव व त्याच्या साथीदाराने गोळ्या
झाडल्या. त्यांच्या छातीमध्ये व डोक्यामध्ये छरे घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. तर त्यांचा मित्र अनिकेत उंबरे किरकोळ जखमी झाला होता. हा हल्ला पूर्व वैमनस्यातून झाल्याचे पोलीसांनी म्हटले आहे़ (प्रतिनिधी)