Akkalkot's fame due to food umbrella: Ranjit Dada | अन्नछत्रामुळे अक्कलकोटचा नावलौकिक : रणजितदादा

अन्नछत्रामुळे अक्कलकोटचा नावलौकिक : रणजितदादा

अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात आले असता न्यासाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल भोसले यांनी त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी ते बोलत होते.

दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन शिव जन्मोत्सव युवक मंडळ यांच्या वतीने न्यासाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना केली. तेथे आमदार मोहिते-पाटील यांनी भेट देवून शिवरायांचे दर्शन घेतले.

यावेळी रहिमान काझी, राजेंद्र चव्हाण, राजू शेटे, झेडपी सदस्य मल्लिकार्जुन पाटील, न. पा. विरोधी पक्ष नेते अशपाक बळोरगी, प्रदीप जगताप, आप्पासाहेब बिराजदार, शिवराज स्वामी, मल्लिनाथ करपे, नाना होटकर व न्यासाचे बाळासाहेब पोळ, सतीश महिंद्रकर, शहाजी यादव, नामा भोसले, दत्ता माने, राजाभाऊ नवले, निखील पाटील, संजय गोंडाळ, महांतेश स्वामी उपस्थित होते.

दरम्यान मागील आठवड्यात स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळास राज्याचे उच्चतंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, स्वाती पाठक, हास्यजत्रा फेम अभिनेता अरूण कदम, महाराष्ट्र साहित्य परिषदेेचे ॲड. प्रमोद आडकर, मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश उमादेवी शिंदे, सांगलीचे निवासी उपजिल्हाधिकारी मैसम्मी चौगुले यांनी भेट दिली.

२४अक्कलकोट-सत्कार

Web Title: Akkalkot's fame due to food umbrella: Ranjit Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.