अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:23 IST2021-05-06T04:23:41+5:302021-05-06T04:23:41+5:30
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागरिक कोरोना आजार अंगावर काढत आहेत. बोगस डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. वेळेवर तपासणी करून घेत ...

अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील नागरिक कोरोना आजार अंगावर काढत आहेत. बोगस डॉक्टरांकडे उपचार घेत आहेत. वेळेवर तपासणी करून घेत नाहीत. या कारणामुळे तालुक्याचा मृत्युदर राज्यात सर्वाधिक ५ टक्के इतका आहे. नागरिकांनी लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घेण्याचे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.
सध्या राज्याचा मृत्युदर दीड टक्के आहे. सोलापूर जिल्ह्याचा दोन टक्के आहे. अक्कलकोट तालुक्याचा मृत्युदर चक्क पाच टक्के आहे. त्याला कारणीभूत जनताच आहे. एकंदरीत आजार लपवून ठेवण्याचा प्रकार सुरू आहे. या आजाराला घाबरण्याचे कारण नाही. वेळेवर कोविड सेंटरमध्ये दाखल होऊन वेळेवर उपचार घ्यावेत, असे आवाहन तहसीलदार मरोड यांनी व्यक्त केले.
पहिल्या लाटेत केवळ ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू पाहायला मिळाला. दुसऱ्या लाटेत ३० ते ४५ वयोगटांतील लोकांना कोरोना घेरत आहे. दररोज तीन ते पाच रुग्णांचा मृत्यू तालुक्यात होत आहे. नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन तहसीलदार अंजली मरोड यांनी केले आहे.
---
अक्कलकोट येथे पहिल्या टप्यात २० ऑक्सिजन बेडचे मोफत डेडिकेटेड हॉस्पिटल सुरू केले आहे. केवळ तीन दिवसांत रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. वाढणारी लोकसंख्या पाहता आणखीन ५० ऑक्सिजन व मिनी व्हेंटिलेटर बेडची सुविधा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सहकार्याने सुरू केले आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील दवाखान्यांवरील भार कमी झाल्याचे तहसीलदार अंजली मरोड यांनी सांगितले.
फोटो:; तहसीलदार अंजली मरोड