रोहिदास महाराज जयंतीनिमित् कुमठ्यात २७ पासून अखंड हरिनाम सपताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:21 IST2021-02-14T04:21:40+5:302021-02-14T04:21:40+5:30
कुमठ्यातील संत रोहिदास महाराज मंदिराचे यंदा रौप्यमहोतसवी वर्ष आहे. यानिमिताने वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिराचे हभप ...

रोहिदास महाराज जयंतीनिमित् कुमठ्यात २७ पासून अखंड हरिनाम सपताह
कुमठ्यातील संत रोहिदास महाराज मंदिराचे यंदा रौप्यमहोतसवी वर्ष आहे. यानिमिताने वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती मंदिराचे हभप महादेव वाघमारे यांनी दिली. हरिकिर्तन सह महिलांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
२७ फेब्रुवारी रोजी विठ्ठल कंदारे तर २८ फेब्रुवारी रोजी पुरुषोत्तम पाटील यांचे हरिकिर्तन होणार आहे. १ मार्च रोजी हभप निवृत्ती महाराज देशमुख आणि २ मार्च रोजी डॉ. जयवंत बोधले महाराज यांचे हरिकिर्तन होणार आहे. ३ मार्च रोजी ज्ञानेश्वर महाराज पठाडे आणि ४ मार्च रोजी समाधान शर्मा महाराज यांचे हरिकिर्तन होणार आहे. ५ मार्च रोजी बाळकृष्ण गडकर तर ६ मार्च रोजी हभप सुधाकार महाराज इंगळे यांचे हरिकिर्तन होणार आहे. ६ मार्च रोजी काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाचा समारोप होणार आहे.