अजित पवार दोन दिवसांसाठी पंढरपूर दौऱ्यावर; कल्याणराव काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश फिक्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 12:56 PM2021-04-07T12:56:28+5:302021-04-07T12:56:31+5:30

अजित पवार दोन दिवस मतदारसंघात ठाण मांडून; काही ठिकाणी प्रचार सभा घेणार..

Ajit Pawar on a two-day visit to Pandharpur; Kalyanrao Kale's NCP entry fixed | अजित पवार दोन दिवसांसाठी पंढरपूर दौऱ्यावर; कल्याणराव काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश फिक्स

अजित पवार दोन दिवसांसाठी पंढरपूर दौऱ्यावर; कल्याणराव काळेंचा राष्ट्रवादी प्रवेश फिक्स

Next

पंढरपूर - पंढरपुर पोटनिवडणूक पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत भाजपा नेते व सहकार शिरोमणी साखर करखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे ऐन निवडणुकीत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहेत. शिवाय मतदारसंघात काही ठिकाणी सभाही घेणार आहेत. या दौऱ्यात आणखी काही प्रवेश व मोठ्या राजकीय घडामोडी घडणार असल्याने अजित पवारांच्या या दौऱ्याला महत्व प्राप्त झाले आहे.

 पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात होत आसलेल्या पोटनिवडणूकीचा प्रचार शिंगेला पोहचला आहे. प्रमुख विरोधीपक्ष असलेल्या भाजपाचे प्रमुख नेते मतदारसंघात ठाण मांडून प्रचार करीत आहेत. तर राष्ट्रवादीकडून ही या पूर्वी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, पक्ष निरिक्षक सुरेश घुले, आ. संजय शिंदे, दीपक साळुंखे, उमेश पाटील आदी मतदारसंघात ठाण मांडून आहेत. आता त्यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर ला दोन दिवसीय दौऱ्यावर येत आहेत.   या दौऱ्यात कल्याणराव काळे यांच्यासह काही प्रमुख नेते पक्षात प्रवेश करीत आहेत. शिवाय काही नाराजांना ही अजित पवार कामाला लावतील. पंढरपूर, मंगळवेढा शहरांसह काही प्रमुख मोठ्या गावात प्रचार सभा, कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. 

गुरुवारी सकाळी 9 वाजता अजित पवार पंढरपूरमध्ये दाखल होत असून श्रेयस पॅलेस मंगल कार्यालयात मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात कल्याणराव काळे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यादृष्टीने काळे समर्थक तयारीला लागले आहेत.

Web Title: Ajit Pawar on a two-day visit to Pandharpur; Kalyanrao Kale's NCP entry fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.