शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

अहिल्यादेवींचे स्मारक लोकवर्गणीतून नको; शासकीय निधीमधूनच साकारायला हवे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 16:10 IST

धनगर विवेक जागृती अभियान संघटनेची मागणी;  कुलगुरूंची चौकशी करा, ढोबळेंना समितीतून वगळा

ठळक मुद्दे पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे ?स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावेअहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी

सोलापूर : विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे स्मारक धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून करण्याचा घाट कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी घातला आहे. या प्रकरणातील त्यांचे कामकाज संशयास्पद असल्याने त्यांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केली आहे.

   तसेच हे स्मारक शासकीय निधीतून झाले पाहिजे, अशी भूमिका ढोणे यांनी मांडली आहे. विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याला विरोध करणाºया माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून वगळावे, अशी मागणी त्यांनी कली आहे. दरम्यान, जागृती समितीचे ढोणे यांनी आज जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन अनुषंगिक मागण्या केल्या आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाला विरोध करणारे लक्ष्मण ढोबळे हे समितीत कसे, असा सवालही ढोणे यांनी विचारला आहे. स्मारक हे विद्यापीठ स्वनिधी किंवा राज्य शासनाच्या निधीमधूनच तयार करावे, अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्या प्रस्तावाला तातडीने मंजुरी द्यावी. 

यासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईची चौकशी व्हावी, विद्यापीठाला पायाभूत सुविधा तसेच मनुष्यबळासाठी आवश्यक तरतूद करावी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांना स्मारक समितीतून तातडीने वगळण्यात यावे, या प्रमुख मागण्यांवर तातडीने कार्यवाही करावी, असेही निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

कुलगुरूंच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी गेले दोन-अडीच महिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्रस्तावित स्मारकासंदर्भात राज्यभरातील धनगर समाजामध्ये चर्चा आहे. धनगर समाजाच्या लोकवर्गणीतून स्मारक उभारण्याचे नियोजन कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी केले आहे. कोरोनाच्या महाभयंकर संकटाकाळात सर्व जण अस्तित्वाची लढाई लढत असताना कुलगुरू फडणवीस यांनी अत्यंत घाईगडबडीने स्मारक समिती स्थापन करून अनुषंगिक बैठका घेतल्या आहेत. त्यांनी मनमानी पद्धतीने ही प्रक्रिया राबवलेली आहे. काहींनी आक्षेप घेतल्यानंतर दोन वेळा या समितीचा विस्तार करण्यात आला आहे. पहिल्या समितीत विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य होते. त्यावेळी राज्य सरकारच्या यंत्रणेला पूर्णपणे बाजूला ठेवण्यात आले होते. नंतर पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाºयांना समितीत घेण्यात आले. तसेच इतर पक्षांचे लोकही घेण्यात आले आहेत. आक्षेपार्ह बाब म्हणजे ज्या लक्ष्मण ढोबळे यांनी सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव द्यायला विरोध केला. त्यांना अहिल्यादेवींच्या स्मारक समितीवर सन्मानाने घेण्यात आले आहे. त्यामुळे यासंबंधीच्या प्रत्येक बाबीची पडताळणी गरजेची आहे.

...अन्यथा आंदोलन !पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या पुण्यतिथीनिमित्ताने शासनाला हे निवेदन देत आहोत. ज्यांनी लोकोद्धारासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले त्या अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी विद्यापीठ अथवा महाराष्ट्र शासनाकडे निधी नाही, हा प्रकार लांच्छनास्पद आहे. याउपर फक्त धनगर समाजाची वर्गणी डोळ्यांसमोर ठेवून करण्यात येत असलेले नियोजन जखमेवर मीठ चोळणारे आहे. त्यामुळे राज्य शासनाने या प्रश्नी तातडीने हस्तक्षेप करावा आणि अहिल्यादेवींची सुरू असलेली अवहेलना थांबवाबी. सध्या कोरोना संकटात आमचे प्रशासनाला सहकार्य आहे. मात्र या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही ढोणे यांनी दिला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur University, Solapurसोलापूर विद्यापीठ, सोलापूरuniversityविद्यापीठEducationशिक्षण