खण-नाराळानं महिलांची ओटी भरली; पहिल्याच दिवशी लक्ष्मी जन्माला आली, सोलापुरात अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह  

By Appasaheb.patil | Published: February 24, 2023 06:46 PM2023-02-24T18:46:40+5:302023-02-24T18:47:05+5:30

सोलापुरात अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाचे उद्घाटन करण्यात आले आहे. 

 Ahilya Devi Holkar Maternity Hospital has been inaugurated in Solapur   | खण-नाराळानं महिलांची ओटी भरली; पहिल्याच दिवशी लक्ष्मी जन्माला आली, सोलापुरात अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह  

खण-नाराळानं महिलांची ओटी भरली; पहिल्याच दिवशी लक्ष्मी जन्माला आली, सोलापुरात अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह  

googlenewsNext

सोलापूर: दुपारची वेळ, स्थळ डफरीन चौकातील राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृह. बऱ्याच महिन्यांनी महिलांची होत असलेली गर्दी पाहून जन्म-मृत्यू दाखला काढण्यासाठी आलेले लोकही अवाक्. आयुक्त आले, मान्यवर गोळा झाले अन् पाच गर्भवती महिलांच्या हस्ते प्रसूतिगृहाचे उद्घाटनही झालं. उद्घाटनानंतर खण-नारळानं महिलांची ओटी भरली..पहिल्या दिवशी प्रसूतीसाठी आलेल्या महिलेने मुलीला जन्म दिला अन् मुलगी झाली ओ..असा गोड आवाज ऐकावयास मिळाला.

यावेळी आयुक्त शीतल तेली-उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, आरोग्याधिकारी डॉ. बसवराज लोहारे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, डॉ. अतिष बोराडे, सिद्धेश्वर बोरगे, डॉ. ज्ञानेश्वर सोडळ, बालाजी अमाईन्सच्या संयुक्त व्यवस्थापकीय संचालक राजेश्वर रेड्डी, वास्तुविशारद मनोज मर्दा, तांत्रिक सल्लागार, मल्लिकार्जुन बिराजदार, डॉ. तन्वगी जोग, डॉ. शिरशेट्टी, बालाजी अमाईन्सचे पीआरओ प्रसाद सांजेकर आदी उपस्थित होते.

पहिल्याच दिवशी एक प्रसूती व आठ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रसूतिगृहात उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी दुपारपर्यंत एक प्रसूती, ८ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया, ४ एनटीपी अशा आरोग्य सेवांचा लाभ देण्यात आला. येथील वैद्यकीय अधिकारी, नर्स व कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून देण्यात येणाऱ्या या सुविधेबद्दल समाधान व्यक्त केले.

२९ कर्मचारी उपलब्ध, २५ जागा लवकरच भरणार
या प्रसूतिगृहात आवश्यक असलेले एकूण ५४ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध ठेवण्यात येणार आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी ३, मेटरन २, कनिष्ठ लिपिक १, मिश्रक १, मिडवाईफ १७, शिपाई ४, आया १८, सफाई कामगार ८ असे एकूण ५४ जणांचा स्टाफ प्रसूतिगृहात उपलब्ध असणार आहे. यापैकी २९ कर्मचारी सध्या तैनात करण्यात आले असून २५ जागा लवकरच भरण्यात येणार आहेत. समुपदेशकही उपलब्ध करण्यात आला आहे.

 

Web Title:  Ahilya Devi Holkar Maternity Hospital has been inaugurated in Solapur  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.