शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

अहो...शाळेत दिलेली दाळ शिजेना; काय आहे गौडबंगाल वाचा सविस्तर बातमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2020 11:57 IST

शालेय पोषण आहाराचा बोजवारा मुगाबरोबर हरभरा डाळही निकृष्ट; अधिकाºयांच्या पाहणीनंतर अन्न व औषध विभागाने घेतले नमुने

ठळक मुद्देमूगडाळ निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर शहरातील पालक व शिक्षकांनी चना डाळही निकृष्ट असल्याचे कळविले याबाबत तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहेमहापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे

सोलापूर : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत प्राथमिक शाळांमध्ये वाटप करण्यात येणाºया मूगडाळीबरोबर चनाडाळही निकृष्ट असल्याचे शिक्षण अधिकाºयांच्या पाहणीत आढळले आहे. दरम्यान, लोकमतच्या वृत्ताची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने मुगाच्या डाळीचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजना योजना राबविण्यात येत होती. पण सध्या कोरोना साथीमुळे शिजविलेला आहार देण्याऐवजी तांदूळ, चना व मूगडाळ विद्यार्थ्यांना दिली जात आहे. धान्य वाटपाचा शासनाने संस्थांना ठेका दिला आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या आहारातील मूगडाळ निकृष्ट असल्याची पालकांनी तक्रारी केल्या होत्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने याची शहानिशा केली.

प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड म्हणाले की, बातमीच्या अनुषंगाने मी दक्षिण सोलापूर तालुक्यातील तीन शाळांना भेटी देऊन आहाराची खातरजमा केली. ठेकेदाराने पॅकिंगमध्ये पुरविलेली मूगडाळ निकृष्ट असल्याचे दिसून आले आहे. 

याबाबत संबंधित ठेकेदारांना नोटीस बजाविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच ज्या ज्या भागात अशी डाळ वाटप झाली ती तातडीने बदलून देण्याचे सांगण्यात आले आहे असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या वृत्ताची अन्न व औषध प्रशासनानेही दखल घेतल्याचे सहायक आयुक्त प्रदीप राऊत यांनी सांगितले. अन्न निरीक्षक देशमुख यांना या डाळीचे नमुने तपासणीसाठी घेण्याची सूचना केली आहे. अन्न व औषध प्रशासनाने यापूर्वीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला किचनबाबत परवाना घेण्याचे कळविले आहे. 

 यंदा कोरोना साथीमुळे किचन बंद असल्याने परवानगीसाठी अर्ज आलेले नाहीत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाºया आहारामुळे त्यांच्या आरोग्याला धोका होत असेल तर याबाबत अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.

आता चना डाळीच्या तक्रारीमूगडाळ निकृष्ट असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केल्यावर शहरातील पालक व शिक्षकांनी चना डाळही निकृष्ट असल्याचे कळविले आहे. याबाबत तक्रारी करूनही शिक्षण विभागाकडून दखल घेतली जात नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. महापालिका शिक्षण मंडळ प्रशासनाने याप्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळाSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद