अरण येथे कृषी विषयक मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:57+5:302020-12-07T04:15:57+5:30
माढ्यात रासायनिक खत विक्री कुर्डूवाडी : माढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने रासायनिक खत विक्री सुरू करण्यात आली आहे. डी.सी.सी.बॅँक ...

अरण येथे कृषी विषयक मार्गदर्शन
माढ्यात रासायनिक खत विक्री
कुर्डूवाडी : माढा तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने रासायनिक खत विक्री सुरू करण्यात आली आहे. डी.सी.सी.बॅँक अधिकारी शशिभाऊ शिंदे यांच्या हस्ते याची सुरुवात करण्यात आली. यावेळी माढा तालुका खरेदी-विक्री संघाचे उपसभापती रामकृष्ण काळे, संचालक संतोष अनभुले, शहाजी यादव, नागन्नाथ माळी, व्यवस्थापक सुधीर चोपडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रभारी सचिव अजिनाथ बोंगाळे, विवेक मोरे, विशाल लंकेश्वर उपस्थित होते.
डोणगाव आश्रमशाळेत आंबेडकरांना अभिवादन
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथील केंद्रीय निवासी माध्यमिक विद्यालय आश्रमशाळेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. आश्रमशाळेच्या अधीक्षक सुषमा फडतरे (कांबळे) यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे विश्वस्त यशवंत फडतरे, मीनाक्षी गायकवाड, गणेश भागवत, शहानवाज शेख, नितीन कांबळे उपस्थित होते. प्रस्तावना, आभार केवल फडतरे यांनी मांडली.