शहरं
Join us  
Trending Stories
1
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
4
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
5
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
6
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
7
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
8
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
9
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
10
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
11
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
12
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
13
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
14
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
15
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
16
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
17
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
18
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
19
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
20
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस

सात वर्षांनी सोलापूरच्या खगोलप्रेमींनी जवळून पाहिले ‘कार्तिकी’च्या चंद्रावरचे खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 14:34 IST

सोलापूर : शहरातील स्मृती उद्यान परिसरात सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रातून खगोलप्रेमींना बुधवारी सायंकाळी कार्तिकीचा चंद्र आणि ...

ठळक मुद्देस्मृती उद्यान येथे उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षणगृहाचे उद्घाटन दूरवर वाहत गेलेल्या लाव्हामुळे बनलेली दरी पाहताना या खगोलप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला

सोलापूर : शहरातील स्मृती उद्यान परिसरात सात वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षण केंद्रातून खगोलप्रेमींना बुधवारी सायंकाळी कार्तिकीचा चंद्र आणि त्यावरील खड्डे अतिशय जवळून पाहता आले. येथील दुर्बिणीतून चंद्राचा ३० वा भाग जवळून पाहताना त्यावरील डोंगर, दरी, उल्कांच्या आदळण्याने निर्माण झालेल्या ज्वालामुखीच्या दूरवर वाहत गेलेल्या लाव्हामुळे बनलेली दरी पाहताना या खगोलप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला. 

स्मृती उद्यान येथे उभारण्यात आलेल्या अवकाश निरीक्षणगृहाचे उद्घाटन २ मार्च २०१२ रोजी माजी राष्टÑपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या हस्ते झाले होते. उद्घाटनानंतर या दुर्बिणीतून एकदाही आकाशदर्शन झाले नाही. पण सहा वर्षे, आठ महिने २० दिवसांनी आकाशदर्शन होण्याचा योग जुळून आला.

आकाश निरीक्षणाच्या तांत्रिक माहितीच्या अभावामुळे या दुर्बिणींची दुरवस्था झाली होती. मागील सात वर्षांत झालेले तंत्रज्ञानातील बदल, दुर्बिणीसाठी लागणारे सॉफ्टवेअर अद्ययावत करण्यासोबतच दुर्बिणीतून दिसणारी प्रतिमा संगणकाद्वारे छायाचित्राच्या माध्यमातून साठवून ठेवण्याचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आले. इनोव्हेशन टेक्नॉलॉजी मुंबई या खगोलशास्त्रीय उपकरणे तयार करणाºया संस्थेने ही दुर्बीण अद्ययावत केली. अनुराग शेवडे या खगोल उपकरण तंत्रज्ञाने चार महिने अथक प्रयत्न करून ही दुर्बीण कार्यान्वित केली. सामाजिक वनीकरणाच्या आकस्मिक निधीअंतर्गत आर्थिक मदत मिळवून देत अधिकारी सुवर्णा माने यांच्या प्रयत्नातून हे केंद्र पुन्हा सुरू केले. 

- बुधवारी सायंकाळी २५० ते ३०० खगोलप्रेमी सोलापूरकरांनी चंद्र अगदी जवळून पाहिला. त्यांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले होते. कार्तिक पौर्णिमेचा चंद्र पिवळसर व सुंदर दिसत होता. चंद्राच्या एका भागाकडील दिसणारा दिवसरात्र यांच्या सीमारेषेच्या प्रदेशातील असंख्य विवरे जवळून पाहता आली. आनंद घैसास, डॉ. व्यंकटेश गंभीर, प्रा. सिद्राम पुराणिक, तंत्रज्ञ अनुराग शेवडे यांनी ही माहिती उपस्थितांना दिली. हे निरीक्षणगृह अद्ययावत व पुन्हा सुरू करण्यासाठी डॉ. सचिन जोग, अनिरुद्ध देशपांडे, संजय भोईटे, अ‍ॅड. रघुनाथ दामले, मोहन दाते, नीता येरमाळकर, सुवर्णा माने आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :SolapurसोलापूरAstrologyफलज्योतिषscienceविज्ञान