शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

लोकमतच्या वृत्तानंतर सोलापूर जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धनचे दोन अधिकारी निलंबित, सीईओ राजेंद्र भारूड यांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:41 IST

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे.

ठळक मुद्देनेमणुकीच्या ठिकाणी वारंवार गैरहजर राहणारे बीबीदारफळ येथील पशुधन विकास अधिकारी भरत माने आणि गायीला चुकीचे कृत्रिम रेतन करणारे पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश दिलेजि.प.चा पशुसंवर्धन विभाग सध्या सदस्यांच्या रडारवरस्वच्छता अभियानात जिल्ह्याचा नावलौकिक करणाºया डॉ. भारुड यांनीही बेफिकीर अधिकाºयांची सफाई करण्याचे काम सुरू

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे. नेमणुकीच्या ठिकाणी वारंवार गैरहजर राहणारे बीबीदारफळ येथील पशुधन विकास अधिकारी भरत माने आणि गायीला चुकीचे कृत्रिम रेतन करणारे पशुधन पर्यवेक्षक मोहन चौधरी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. जि.प.चा पशुसंवर्धन विभाग सध्या सदस्यांच्या रडारवर आहे. या विभागातील बेफिकीर कारभाराची पोलखोल ‘लोकमत’ने सुरू केली आहे. स्वच्छता अभियानात जिल्ह्याचा नावलौकिक करणाºया डॉ. भारुड यांनीही बेफिकीर अधिकाºयांची सफाई करण्याचे काम सुरू केले आहे. बीबीदारफळ येथील पशुधन विकास अधिकारी भरत माने यांच्याबाबत सुरेश साठे यांनी तक्रार केली होती. माने यांनी मद्य पिऊन चुकीचे उपचार केल्याने ८.५ महिन्यांची गाभण जर्सी गाय खाली झाली. शिवाय माने हे गावात येत नसल्याची तक्रार सरपंचांनी केली होती. यासंदर्भात ‘लोकमत’ने दिलेल्या वृत्ताचा उल्लेखही निलंबन आदेशात करण्यात आला आहे. यावरुन माने यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे जि. प. तील कामचुकार अधिकाºयांचे धाबे दणाणले आहेत.--------------------------चुकीचे रेतन केल्याचे कबूल केले...मोहन चौधरी यांनी पशुधन विकास अधिकारी या पदावर बीबीदारफळ येथे कार्यरत असताना शाहू लामकाने यांच्या खिलार गायीला चुकीचे कृत्रिम रेतन केले. त्यामुळे या गायीला होस्टन (जर्सी) जातीच्या वासराचा जन्म झाला. याबद्दल विचारणा केल्यानंतर चुकून झाल्याचे कबूल केले. चौधरी यांच्या बेफिकीर कारभारामुळे गायीच्या गर्भधारणेवर परिणाम झाला आहे. गायीला चारवेळा कृत्रिम रेतन करुनही ती गाभण राहिलेली नाही. या प्रकरणी गैरशिस्तीच्या वर्तनाबाबत चौधरी यांना निलंबित करण्यात आले आहे. -----------------पराग यांच्यावर केव्हा होणार कारवाई जिल्ह्यात अनेक पशुधन विकास अधिकारी आणि पशुधन पर्यवेक्षकांबाबत तक्रारी येत आहेत. तरीही पशुधन विकास अधिकारी डॉ. किरण पराग या तक्रारींकडे दुर्लक्ष करीत आले आहेत. अलीकडच्या काळात तर कृषी व पशुसंवर्धन सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी डॉ. पराग यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू केले होते. मोहन चौधरी यांच्याबाबतच्या तक्रारी तर खूपच जुन्या आहेत.‘लोकमत’ने या प्रकरणांची पोलखोल केल्यानंतर सीईओ डॉ. भारुड यांनी कार्यवाहीचे आदेश दिले. त्यामुळे पशुपालकांच्या गंभीर तक्रारींकडे दुर्लक्ष करणाºया डॉ. किरण पराग यांच्यावर कोणती कारवाई होणार, असा सवाल उपस्थित होत आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद