भावाच्या अस्थीचे विसर्जन करून निघाला वाटेत ट्रकची धडक अन्‌ जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:20+5:302021-07-22T04:15:20+5:30

सतीश धोंडिराम मिसाळ (रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पळून जाताना तरुणांनी ...

After immersing his brother's bones, he was hit by a truck on the way and died on the spot | भावाच्या अस्थीचे विसर्जन करून निघाला वाटेत ट्रकची धडक अन्‌ जागीच ठार

भावाच्या अस्थीचे विसर्जन करून निघाला वाटेत ट्रकची धडक अन्‌ जागीच ठार

सतीश धोंडिराम मिसाळ (रा. पाचेगाव खुर्द, ता. सांगोला) असे मृताचे नाव आहे. अपघातानंतर चालक ट्रक घेऊन पळून जाताना तरुणांनी पाठलाग करून मठवस्ती-कासेगाव येथे पकडला.

पाचेगाव खुर्द येथील सतीश धोंडिराम मिसाळ व माऊस भाऊ सोमनाथ विलास खंडागळे (रा. संगेवाडी, ता. सांगोला) हे दोघे पाचेगाव येथून बुधवारी सकाळी ९ वाजता दुचाकी (एमएच ४५ /एच २६५०) वरून भाऊ संतोष मिसाळ याच्या अस्थी विसर्जनसाठी पंढरपूरला गेले होते. अस्थी विसर्जन करून तेथून परत गावाकडे येताना वाटेत मावस भाऊ सोमनाथ विलास खंडागळे यास संगेवाडी येथील घरी सोडले. तेथून सतीश मिसाळ सायंकाळी पाचच्या सुमारास घराकडे निघाला होता.

मेथवडे फाटा-खंडागळे वस्ती येथे समोरून सांगोल्याकडून भरधाव येणाऱ्या ट्रक (एमएच ०९ /एचएच ३२११)च्या चालकाने विरुद्ध बाजूने येऊन दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. यामध्ये दुचाकी रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात फेकल्याने संतोष मिसाळ यांच्या डोक्याला गंभीर मार लागून तो जागीच ठार झाला.

----

मावसभावाने पाहिले

अपघाताच्या आवाजाने मावस भाऊ सोमनाथ खंडागळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सतीश मिसाळ मृतावस्थेत पडल्याचे दिसून आले. याबाबत सोमनाथ खंडागळे यांनी फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: After immersing his brother's bones, he was hit by a truck on the way and died on the spot