शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मजूरटंचाईवर मात; गहू अन् उसानंतर आता तूर कापणीलाही हार्वेस्टर मशीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 13:11 IST

शेतकऱ्यांचा पैसा, वेळेची बचत

ठळक मुद्देअक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात तूर उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरूमशीनमुळे शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे

चपळगाव : खरीप हंगामात अतिवृष्टीतून कसेबसे वाचलेल्या तुरीची रास करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर होते. मात्र पंजाब राज्यातून अक्कलकोट तालुक्यात हार्वेस्टर मशीनरी दाखल झाल्या आहेत. या मशीनरीमुळे काही मिनिटात एकेका फडाच्या तुरीची रास होते. या मशीनमुळे शेतकऱ्यांच्या वेळेत व खर्चात मोठी बचत होत असल्याचे दिसून येत आहे.

अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात तूर उत्पादकांनी या मशीनच्या माध्यमातून रास करण्यासाठी धावपळ सुरू केली आहे. वास्तविक पारंपरिक पद्धतीने तुरीची रास करण्यासाठी मजुरांच्या मदतीने अगोदर कापणी करावी लागते. त्यानंतर कापलेले पीक गोळा करून मळणी मशीनच्या साह्याने रास करावी लागते. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी किमान दोन ते तीन दिवस लागतात. यामध्ये कामास लावलेल्या प्रत्येक मजुराला दिवसाकाठी ३०० ते ३५० रुपये मजुरी द्यावी लागते. एका एकरासाठी जवळपास पाच मजुरांना दिवसभर घेऊन रास करावी लागते. मात्र कमी वेळेत आणि कमी पैशात पंजाबी मशीनवर ही रास पूर्ण होते. पंजाबी मशीनसाठी एकरी १३०० ते १४०० रुपये भाडे घेतले जाते. यामुळे शेतकरी पंजाबी मशीनच्या साह्याने रास करण्यावर भर देत आहेत, असे डोंबरजवळगेचे शेतकरी मुन्ना होदलुरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या दृष्टीने तुरीची रास करण्यासाठी पंजाबी हार्वेस्टर मशीन उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे पंजाबमधील शेतकऱ्यांशी संपर्क ठेवून दरवर्षी मशीन मागवत आहे. याच मशीनद्वारे रास करण्यासाठी प्रतिवर्षी वाढच होत आहे. - विश्वनाथ भरमशेट्टी, शेतकरी, हन्नूर

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरी