पत्नीचा छळ करून मुख्याध्यापकानं केलं परस्पर दुसरं लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:23 IST2021-08-29T04:23:50+5:302021-08-29T04:23:50+5:30

पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी योगीता बापू अडसूळ हिचे २०१२ मध्ये अंकोली (ता. अंकोली) येथील व सध्या म्हैसगाव येथील मातोश्री विद्यालयात ...

After harassing his wife, the headmaster remarried; Crimes against seven people | पत्नीचा छळ करून मुख्याध्यापकानं केलं परस्पर दुसरं लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा

पत्नीचा छळ करून मुख्याध्यापकानं केलं परस्पर दुसरं लग्न; सात जणांविरुद्ध गुन्हा

पोलीस सूत्रांनुसार फिर्यादी योगीता बापू अडसूळ हिचे २०१२ मध्ये अंकोली (ता. अंकोली) येथील व सध्या म्हैसगाव येथील मातोश्री विद्यालयात मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे बापू बाबासाहेब अडसूळ याच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर मात्र माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी फिर्यादीला पतीच्या घरातील सर्वजण त्रास देऊ लागले. फिर्यादीच्या वडिलांनी पहिल्यांदा एक लाख रुपये व दुसऱ्यांदा तीन लाख रुपये त्यांना दिले. तरीही छळ सुरूच राहिला. कंटाळून ती आपल्या माहेरी गेली.

यादरम्यान ती आजारी पडली व डायलिसिस सुरू झाले. यावेळी सन २०१८ दरम्यान फिर्यादीच्या पतीला पगार सुरू झाला. दरम्यान, त्याने परस्पर दुसरे लग्न करून फिर्यादीला फसविले. फिर्यादीच्या तक्रारीवरून कुर्डूवाडी पोलिसांत पती बापू अडसूळ, सासू बाई अडसूळ, सासरा बाबासाहेब अडसूळ, दीर अनिल अडसूळ, जाऊ दीपाली अडसूळ, नणंद सोनाली क्षीरसागर, नंदवा निवृत्ती क्षीरसागर (सर्व रा. अकोली, ता. मोहोळ) या सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम बोधे करीत आहेत.

----

.....................

Web Title: After harassing his wife, the headmaster remarried; Crimes against seven people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.