शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

घर फोडून दागिने घेऊन तिघे पळत सुटले, पाठलाग करुन नागरिकांनी दोघांना पकडले

By काशिनाथ वाघमारे | Updated: June 20, 2023 20:59 IST

वरवडेतील घटना : ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांची कामगिरी

सोलापूर : वरवडेत एका दुग्ध व्यवसायिकाचे घर फोडून दागिन्यांसह ५५ हजारांचा ऐवज घेऊन पोबारा करीत असताना सतर्क नागरिकांनी आणि ग्राम सुरक्षा दलाच्या तरुणांनी चोरट्यांचा पाठलाग केला. या पाठलागात दोघेजण सापडले आणि त्यांचा तिसरा साथिदार पळून जाण्यात यशस्वी झाला.

रवी चंद्रकांत पवार, किरण अनिल काळे असे नागरिकांच्या तावडीत सापडलेल्या संशयीत चोरट्यांची नावे असून तिसरा साथिदार चिरंजीव उर्फ खोडघ्या हरकून काळे (तिघे रा. सय्यद वरवडे, ता. मोहोळ) हा फरार झाला. त्या दोघांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पोलीस सूत्राकडील माहितीनुसार दुग्ध व्यवसायिक दत्तात्रय मोहन गवळी हे कुटुंबासह वरवडे टोल नाक्याजवळ शेतात राहतात. उकाडा जाणवत असल्याने सोमवारी रात्री गवळी कुटूंब घर बंद करुन गच्चीवर झोपी गेले होते. मंगळवारी मध्यरात्री २.४५ वाजण्याच्या सुमारास संशयीत चोरटे गवळी यांच्या बंद घराचा कडीकोयंडा उचकटून प्रवेश केला आणि पाच ग्रॅम कर्णफुले व रोख रक्कम ३० हजार रुपये असा ५५ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. त्यानंतर दत्तात्रय गवळी यांनी टेंभुर्णी पोलिसात धाव घेऊन फिर्याद दिली. अधिक तपास ठाणे अंमलदार गणेश जगताप करीत आहेत.ग्रामसुरक्षा दलाचा फोन वाजला दोघांना पकडून पोलिसांना दिले... मागील तीन दिवसांपासून मोडनिंब, बावी, अरण परिसरात रात्री चोरटे फिरत असल्याचे काही तरुणांना दिसून आले. या तरुणांनी याबाबत ग्रामसुरक्षा दलाच्या तरुणांनी माहिती पसरवली होती. यावरुन लोक जागृत झाले. मंगळवारी मध्यरात्रीनंतर वरवडे परिसरात याच चोरट्यांनी चोरी करून पोबारा करताना ग्रामसुरक्षा दलाचा फोजन वाजला आणि सर्वांना संदेश गेला. नागरिकांनी पाठलाग केला आणि तिघांपैकी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारी