भाजपा उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा उमेदवार अर्ज बाद
By Admin | Updated: February 4, 2017 14:59 IST2017-02-04T14:59:33+5:302017-02-04T14:59:33+5:30
भाजपाच्या उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा अर्ज निवडणूक अधिका-यांनी बाद केला आहे. 15 वर्ष नगरसेविका असलेल्या भाजपा उमेदवार विजया यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.

भाजपा उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा उमेदवार अर्ज बाद
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 4 - भाजपाच्या उमेदवार विजया वड्डेपल्ली यांचा अर्ज निवडणूक अधिका-यांनी बाद केला आहे. 15 वर्ष नगरसेविका असलेल्या भाजपा उमेदवार विजया यांचा अर्ज बाद झाल्याने भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे. अर्ज छाननीवेळी भाजपा उमेदवार वड्डेपल्ली यांनी प्रभाग 13 ब आणि क मधून दोन अर्ज भरले होते. दोन्ही अर्जात एकच सूचक व अनुमोदक होते. मात्र ज्या अर्जाला पक्षचा बी फॉर्म जोडला होता, त्यात त्यांनी सूचकाचे नाव पेनाने खोडुन दुसरे नाव लिहिले. फॉर्मवर केलेली खाडाखोड यावर काँग्रेस उमेदवार राधा होमकर यांनी आक्षेप नोंदवला.
आक्षेप ग्राह्य धरत निवडणूक निर्णय अधिका-यांनी वड्डेपल्ली यांचा अर्ज बाद केला. त्यामुळे वड्डेपल्ली आता भाजपाकडून निवडणूक लढू शकणार नाहीत. मात्र प्रभाग 13 ब मधून त्यांचा अर्ज अपक्ष म्हणून मंजूर आहे. त्यामुळे त्या भाजपच्याच अधिकृत उमेदवार पूजा धोत्रे यांच्या विरोधात बंडखोरी करुन लढतात की माघार घेऊन घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
वड्डेपलींचा अर्ज बाद झाल्याने प्रभाग तेरा मधील राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुखांच्या नेतृत्वाखालील भाजपा पॅनल डळमळीत झाला असून त्यांना हा मोठा झटका आहे. तर दुसरीकडे काँग्रेसची ताकद दुपटीने वाढली आहे.