शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
4
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
5
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
6
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
7
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
8
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
9
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
10
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
11
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
12
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
13
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
14
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
15
आयोग नव्हे, मतदारच राजा !
16
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
17
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
18
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
19
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
20
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?

गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सोलापुरात शाई फेक; संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 16:42 IST

सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली.

सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्रकार परिषदेत गोंधळ झाला. सदावर्ते यांच्यावर मराठा आरक्षण आंदोलकांनी काळी शाई फेकली. आज सोलापुरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते पत्रकार परिषद घेत होते, यावेळी त्यांच्या अंगावर शाईफेक झाली आहे. यावेळी आंदोलकांनी मराठा आरक्षण संदर्भात घोषणा दिल्या आहेत. 

यावेळी वकील सदावर्ते यांनी आंदोलकांचा निषेध केला. अशा शाईफेक हल्ल्यांना मी घाबरत नसल्याचे सदावर्ते म्हणाले. ही शाईफेक संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा आरोप सदावर्ते यांनी केला. यावेळी त्यांनी माजी उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार यांच्यावर टीका केली. 

'मी संवीधानाची भाषा बोलतो म्हणून मला टारगेट केले जात असल्याचा यावेळी सदावर्ते यांनी आरोप केला. काल उस्मानाबादमध्ये स्वतंत्र मराठवाडा परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा संघटनांनी गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. 

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा; 20 लाख रोजगार देण्याचा दावा

या शाईफेकीला विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोपही सदावर्ते यांनी केला आहे.  तसेच काही पोलिसांनी हाताशी धरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बदनाम करण्याचा हा डाव आहे, असंही गुणरत्न सदावर्ते म्हणाले. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे