समाजासाठी झटणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी प्रशासन : सातपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:16 IST2021-06-24T04:16:31+5:302021-06-24T04:16:31+5:30

पंढरपूर : समाजासाठी रक्ताचे पाणी करत सतत सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे पोलीस प्रशासन उभे ...

Administration with the support of the police fighting for the society: Satpute | समाजासाठी झटणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी प्रशासन : सातपुते

समाजासाठी झटणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी प्रशासन : सातपुते

पंढरपूर : समाजासाठी रक्ताचे पाणी करत सतत सेवेसाठी तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या पाठीशी तेवढ्याच ठामपणे पोलीस प्रशासन उभे राहत असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.

विठ्ठल पोलीस सह. गृहनिर्माण सोसायटीच्या भूमिपूजन समारंभाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, राजेश देवरे, प्रशांत भस्मे, अरुण पवार, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, पोलीस कर्मचारी वामन यलमार, गजानन माळी, विशाल शिंदे उपस्थित होते.

ना नफा ना तोटा या तत्त्वावर पोलीस कर्मचाऱ्यांसाठी घरे बांधून देण्यात येणार आहेत. यामुळे पोलिसांच्या हक्काच्या घराचे स्वप्न लवकर पूर्ण होणार असल्याचे तेजस्वी सातपुते यांनी सांगितले.

---

फोटो : २२ पंढरपूर

विठ्ठल पोलीस सह. गृहनिर्माण सोसायटी भूमिपूजन समारंभाप्रसंगी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, डीवाय एस. पी. विक्रम कदम, तहसीलदार सुशील बेल्हेकर, पोलीस निरीक्षक किरण अवचर, राजेश देवरे, अरुण पवार, प्रशांत भस्मे, दत्तात्रय गावडे.

----

Web Title: Administration with the support of the police fighting for the society: Satpute