आदिनाथची सभा बागलांच्या घरी नको, कारखानास्थळी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:28 IST2021-09-16T04:28:04+5:302021-09-16T04:28:04+5:30

आदिनाथ साखर कारखान्याची मागील सभा ऑनलाईन झाली. सभेचे स्थळ आदिनाथ कारखाना दाखवला, परंतु ती सभा बागल कार्यालयात झाली ...

Adinath's meeting should not be at Bagal's house, but at the factory | आदिनाथची सभा बागलांच्या घरी नको, कारखानास्थळी घ्या

आदिनाथची सभा बागलांच्या घरी नको, कारखानास्थळी घ्या

आदिनाथ साखर कारखान्याची मागील सभा ऑनलाईन झाली. सभेचे स्थळ आदिनाथ कारखाना दाखवला, परंतु ती सभा बागल कार्यालयात झाली आहे. कारखानास्थळ सोडून जाणीवपूर्वक दुसरीकडे सभा घेतली जात आहे. कारखानास्थळ सोडून घेतलेल्या ठिकाणी आम्हाला थांबता येत नाही. आम्हाला आमचे मत मांडण्याचा अधिकारी हिरावून घेतला जात आहे. मागील जनरल मिटिंगच्या प्रोसेडिंग नक्कलची मागणी गेल्या सहा महिन्यांपासून आम्ही करीत आहोत, तरीही नक्कल देण्यात आली नाही. सत्ताधाऱ्यांनी केलेल्या चुका झाकण्यासाठी ते असे प्रकार करीत आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. कारखान्याची प्रत्येक मिटिंग कारखाना स्थळावरच व्हावी, अशी मागणी संचालकांनी केली आहे.

Web Title: Adinath's meeting should not be at Bagal's house, but at the factory