शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

अभिनेता आमीर खानला सोलापूर महापालिका मानपत्र देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 17:45 IST

महापालिकेतर्फे मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव २५ मे रोजी होणाºया महापालिकेच्या सभेत देण्यात आला आहे. 

ठळक मुद्देपाणी बचतीच्या उपक्रमाची दखल मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव

सोलापूर: लोकचळवळीच्या माध्यमातून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी अभिनेता आमीर खान यांनी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केलेल्या पाणी बचतीच्या उपक्रमाची दखल घेत महापालिकेतर्फे मानपत्र देऊन यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव २५ मे रोजी होणाºया महापालिकेच्या सभेत देण्यात आला आहे.

अभिनेता आमीर खानने पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून राज्यातील शेकडो गावांसाठी जलमित्र म्हणून नोंदणी सुरू केली आहे. या माध्यमातून सुरू केलेल्या वॉटरकप उपक्रमास मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. सोलापूर जिल्ह्यातही गेली दोन वर्षे ही चळवळ वेगाने वाढत आहे.

उत्तर सोलापूर तालुक्यातील नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आमीर खान यांनी पत्नीसह श्रमदानात सहभाग नोंदविला. याची प्रेरणा घेत गावातील आबालवृद्धांनी सकाळ व संध्याकाळ अशा दोन सत्रात श्रमदान करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी तळी तयार केली आहेत. समाजातील प्रत्येक स्तर व तरुणाईला विधायक कार्यासाठी सोबत घेऊन त्यांनी केलेले काम देशाला प्रेरणादायी ठरले आहे. या कार्याची दखल घेत महापालिकेतर्फे मानपत्र देऊन आमीर खान यांचा यथोचित गौरव करण्याचा प्रस्ताव रवी कैय्यावाले, अंबिका पाटील, विनायक वीटकर यांनी दिला आहे. 

याचबरोबर वादळी पावसाने भिंत कोसळून मरण पावलेल्या दिव्या गजेली यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करणे, हद्दवाढ विभागात बागा करणे,कुष्ठरोग बेघरांना निवारा बांधण्याचा १ कोटी ५३ लाखांचा ठेका गायत्री कन्स्ट्रक्शनला देण्याचा प्रस्ताव सभेसमोर ठेवण्यात आला आहे.  झंवर मळा येथील ड्रेनेजच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी प्रस्ताव दिला होता. यातून महापालिकेने केलेले काम अर्धवट आहे. त्यानंतर वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून जुना कारंबा नाका ते समर्थ हॉटेल ड्रेनेजलाईन टाकण्याचा प्रस्ताव पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मंजूर केला.

महापालिका निवडणुकीच्यावेळेस कामाचे भूमिपूजन केले. पण आता  महामार्ग पार करण्यासाठी परवानगी न मिळाल्याचे कारण पुढे करून बाळे येथील डुमणेनगरात ड्रेनेजलाईन टाकण्याचा बदल जिल्हाधिकाºयांच्या त्रिसदस्यीय समितीकडे पाठविण्यासाठी मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवला आहे. या प्रस्तावाला विरोध करणार असल्याचे चंदनशिवे यांनी सांगितले. पालकमंत्र्यांनी भूमिपूजन केलेले काम होणे गरजेचे आहे. केवळ मी प्रस्ताव दिला म्हणून बदल करणे बरोबर नाही. दोन्ही कामे माझ्याच प्रभागात असली तरी भगवती सोसायटी ते प्रभाकर सोसायटीतील नागरिकांची सोय होणे महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाAamir Khanआमिर खानSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका