शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

एफआरपी न देणाºयांवर सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांवर लवकरच होणार कारवाई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2018 12:50 PM

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना ...

ठळक मुद्देकारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिलीआरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले

सोलापूर : जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापि एकरकमी एफआरपीची रक्कम शेतकºयांना दिली नसल्याने आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना देणार असल्याचे पुणे प्रादेशिक सहसंचालक (साखर) डॉ. संजय भोसले यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यातील तीन कारखान्यांनी एफआरपीच्या ८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीनुसार एकरकमी एफआरपी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांनी २२ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली होती. या बैठकीत पुणे प्रादेशिक सहसंचालक डॉ. संजय भोसले यांच्यासमोरच एकरकमी एफआरपी देण्यात येईल, असे पत्र देण्याच्या सूचना साखर कारखान्यांना दिल्या होत्या. 

लोकमंगल कारखाना वगळता कोणीही असे पत्र दिले नाही. अशाप्रकारचे पत्र जिल्हाधिकाºयांकडे देण्याबाबत कसलाही कायदा नसल्याचे साखर कारखानदारांचे मत आहे. जे कायद्यात नाही ते आम्ही लेखी देण्याचा प्रश्नच येत नसल्याची भूमिका घेणाºया कारखान्यांनी एफआरपी धोरणानुसार शेतकºयांना उसाचे पैसेही दिले  नाहीत.

जिल्ह्यात सध्या ३१ साखर कारखाने सुरू असून, जयहिंद साखर कारखान्याने प्रति टन २२०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले असले तरी त्याची माहिती प्रादेशिक कार्यालयाकडे नाही. 

पांडुरंग श्रीपूर, सासवड माळी शुगर व विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर या साखर कारखान्यांनी २१०० रुपयांनी शेतकºयांना पैसे दिले आहेत. दोन दिवसांखाली झालेल्या कारखान्यांच्या बैठकीत ही माहिती कारखान्यांनी दिली. या तिन्ही साखर कारखान्यांची एफआरपी २४०० ते २५०० रुपये आहे. कारखान्यांनी आजपर्यंत केलेल्या गाळपाची माहिती घेऊन एफआरपी न देणाºया कारखान्यांवर आरआरसीनुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव साखर आयुक्तांना मंगळवारी देणार असल्याचे प्रादेशिक सहसंचालक डॉ. भोसले यांनी सांगितले. 

२७ कारखान्यांचे ४६ मेट्रिक टन लाख गाळप- जिल्ह्यात सुरू असलेल्या सिद्धेश्वर कुमठे, लोकमंगल बीबीदारफळ, लोकमंगल भंडारकवठे या कारखान्यांच्या गाळपाच्या आकडेवारीची नोंद नाही. अन्य २७ साखर कारखान्यांचे ४५ लाख ७७ हजार १०१ मे. टन गाळप झाले तर ४३ लाख ५० हजार ८१५ क्विंटल साखर तयार झाली आहे. चार डिसेंबरच्या साखर आयुक्त कार्यालयाच्या नोंदीनुसार राज्यातील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरच्या साखर कारखान्यांचे गाळप सर्वाधिक आहे. अहमदनगर व पुणे हे दोन जिल्हे अनुक्रमे ३२ लाख गाळप करुन दुसºया क्रमांकावर आहेत. 

कारखान्याला ऊस आल्यानंतर १४ दिवसात पैसे देण्याचा कायदा असला तरी साखरेला दर नसल्याने पैशाची अडचण आहे. बँकांकडून कर्ज घेऊन पैशाची तरतूद करण्यात येत आहे. एकरकमी एफआरपी द्यावी लागेल.- महेश देशमुख,अध्यक्ष, लोकमंगल शुगर बीबीदारफळ

आम्ही कोल्हापूरप्रमाणेच पैसे दिले- साखरेचा उतारा कमी आहे, उत्पादित साखर विक्री होत नाही, दरही कमी असल्याने आम्ही एफआरपीच्या ८०-८२ टक्के रक्कम शेतकºयांना दिल्याचे स्पष्टीकरण विठ्ठलराव शिंदे, पांडुरंग व सासवड माळी शुगर या कारखान्यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या कारखान्यांनीही अशाच पद्धतीने शेतकºयांना पैसे दिल्याचेही या तीन कारखान्यांनी सांगितले आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय