शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई होणार, सहकारमंत्र्यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 13:26 IST

५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांची थकबाकी अदा करा

ठळक मुद्देशेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावीऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारीसाखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला

 

सोलापूर : साखर कारखानदारांनी शेतकºयांच्या ऊस खरेदीपोटी थकीत असलेली रक्कम येत्या पाच सप्टेंबरपर्यंत अदा करावी. सूचना देऊनही एफआरपी थकविणाºया साखर कारखानदारांवर कारवाई केली जाईल, असा इशारा सहकारमंत्री तथा वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेतून दिला.

सहकारमंत्री म्हणाले, ऊस उत्पादकांची कारखानदारांकडे थकबाकी असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. या संदर्भात कारखानदारांना वारंवार सूचनाही देण्यात आल्या आहेत. ही रक्कम अदा करण्यासाठी कारखानदारांना अडचण असेल तर त्यांनी बफर स्टॉकवर कर्ज घेतल्यास त्याच्या पुनर्गठनाचाही पर्याय ठेवला आहे. हे लक्षात घेता पाच सप्टेंबरच्या आत माझ्यासह सर्वांनी शेतकºयांची बिले द्यावीत, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. साखरेचे दर आणि कारखानदारांकडे विक्रीअभावी पैसा थकलेला आहे, याची जाण सरकारला आहे. हा व्यवसाय ठप्प पडू देणार नाही, यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

ऊस गाळप हंगाम येत्या एक आॅक्टोबरपासून सुरू होणार आहे. विक्रीसाठी कारखान्यावर येणाºया उसाच्या वजनामध्ये होणारी फसवणूक रोखण्यासाठी भरारी पथक नियुक्त केले जाईल. यात वजनमापे कार्यालयातील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी, शेतकरी संघटनेचा प्रतिनिधी आदींचा समावेश असेल. वजनकाट्यात अनियमितता आढळल्यास या पथकाच्या अहवालानुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. उसाच्या शेतीसाठी जलयुक्त शिवार योजना फायदेशीर आहे. मुख्यमंत्र्यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून यातून शेतकºयांच्या जीवनात क्रांती होत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार- सोलापूरचे ब्रँडिंग महाराष्टÑभर करणार असल्याचा मनोदय सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केला. ते म्हणाले, सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने १६ ते १८ सप्टेंबर या काळात पुण्यामध्ये तीन दिवसीय सोलापूर महोत्सव घेतला जाणार आहे. त्यानंतर नागपूर आणि इचलकरंजीतही असा महोत्सव घेण्याचे नियोजन आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरी