सोलापूरात १४ जणांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई
By Appasaheb.dilip.patil | Updated: July 28, 2017 17:45 IST2017-07-28T17:44:56+5:302017-07-28T17:45:17+5:30
सोलापूर दि २८ : सोलापूर जिल्ह्यातील दोन टोळ्यांमधील १४ जणांवर सोलापूर ग्रामीण पोलीसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली़

सोलापूरात १४ जणांविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २८ : सोलापूर जिल्ह्यातील दोन टोळ्यांमधील १४ जणांवर सोलापूर ग्रामीण पोलीसांनी मोक्का अंतर्गत कारवाई केली़
विलास नरहरी उबाळे (वय ३८, रा़ म्हैसगांव, ता़ माढा), रामा राजेंद्र साडेकर (वय २४ रा़ परांडा), सोमनाथ रामलिंग भोसले (वय ३० रा़ चिंचगांव ता़ माढा), संतोष उर्फ आप्पासाहेब रामचंद्र राऊत (वय ३५ रा़ म्हैसगांव ता़ माढा), भाग्यवंत उर्फ मोना कांतीलाल थोरबोले (वय २७ रा़ वागेगव्हाण ता़ परांडा), ज्ञानेश्वर उर्फ बप्पा सुरेश लावंड (वय ३१ रा़ बार्शी), विपुल महादेव मुठाळ (वय १६) तर टोळी क्रमांक २ मधील लाड्या रामा भोसले़ बियाज दुरजा काळे, तोºया दुरजा काळे, अकबºया दुरजा काळे, कश्मिºया दुरजा काळे, सपाल्या भिमशा शिंदे, नाग्या जिझिंग्या पवार यांच्याविरूध्द मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे़
ही कारवाई बार्शी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून सादर करण्यात आले होते़ त्यास पोलीस अधिक्षक एस़ विरेश प्र्रभू यांच्या शिफारशीवरून विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांनी मंजुरी दिली़