काळ्या रंगाची काच लावलेल्या दोन वाहनांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:23 IST2021-03-27T04:23:27+5:302021-03-27T04:23:27+5:30

चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या रंगाची स्क्रीन लावलेली दिनेश खटकाळे (रा. अकोला) यांची चारचाकी गाडी आणि दीपक पवार व अक्षय ...

Action on two vehicles with tinted glass | काळ्या रंगाची काच लावलेल्या दोन वाहनांवर कारवाई

काळ्या रंगाची काच लावलेल्या दोन वाहनांवर कारवाई

चारचाकी वाहनांच्या काचांना काळ्या रंगाची स्क्रीन लावलेली दिनेश खटकाळे (रा. अकोला) यांची चारचाकी गाडी आणि दीपक पवार व अक्षय पवार (रा. वाटंबरे) यांची चारचाकी गाडी सांगोला पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणली. दोन्ही वाहनांच्या काचांना लावलेली काळी फिल्म काढून दोघांना प्रत्येकी १७०० रुपयांचा दंड केला आहे.

नागरिकांनी चारचाकी वाहनांच्या काचांना संपूर्ण काळी फिल्म लावलेली, तसेच फॅन्सी नंबर प्लेट लावलेल्या गाड्यांची माहिती सांगोला पोलीस स्टेशनला द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर, पोहेकॉ आप्पासो पवार, पोहेकॉ दत्तात्रय खिलारे, पोना कदम, पोना घुगे, पोकॉ सचिन देशमुख, पोकॉ धुळा चोरमुले, पोकॉ इरकर यांनी कारवाई केली आहे.

Web Title: Action on two vehicles with tinted glass