ध्वनी प्रदुषण करणाºया वाहनांवर सोलापूरात कारवाई, उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहिम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 16:49 IST2017-08-09T16:49:07+5:302017-08-09T16:49:09+5:30
सोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली़ ही मोहिम सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर राबविली़ यात २५ वाहनांवर कारवाई करून २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला़

ध्वनी प्रदुषण करणाºया वाहनांवर सोलापूरात कारवाई, उपप्रादेशिक परिवहन विभागाची मोहिम
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ९ : महाराष्ट्र परिवहन आयुक्त, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त सोलापूर शहर व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, वाहतुक नियंत्रण शाखा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने वाहनाच्या कर्कश हॉर्न आवाजामुळे होणाºया ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी वाहन तपासणी मोहिम राबविण्यात आली़ ही मोहिम सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सावळेश्वर टोलनाक्यावर राबविली़ यात २५ वाहनांवर कारवाई करून २५ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला़
उच्च न्यायालयासमोर जनहित याचिका मध्ये ध्वनी प्रदुषणाची अंमलबजावणीबाबत सुनावणी चालू असल्याने दिलेल्या निर्देशानुसार ध्वनी प्रदूषणाचे उल्लंघन करणाºया बेकायदेशीर हॉर्न, सायरन तसेच फेरफार केलेल्या सायलेन्सवर कारवाई करण्याचे व ध्वनी प्रदूषणाबाबत नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच याबाबत जनजागृती करण्याबाबतच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली़
याशिवाय उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नवीन नोंदणीसाठी व वाहन योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी व अनुज्ञप्तीची चाचणी करिता येणाºया वाहनाला बेकायदेशीर हॉर्न, सायरन तसेच फेरफार केलेले सायलेन्सर आढळून आल्यास त्या वाहनावरही कारवाई करण्यात आली़ ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली़