सुस्ते, भटुंबरे, नेपतगावात अवैध वाळू उपशावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:22 IST2021-04-25T04:22:22+5:302021-04-25T04:22:22+5:30
पंढरपूर शहर व तालुका हद्दीतील भीमा नदीपात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी एक पथक तयार केले आहे. ...

सुस्ते, भटुंबरे, नेपतगावात अवैध वाळू उपशावर कारवाई
पंढरपूर शहर व तालुका हद्दीतील भीमा नदीपात्रातून होणारी वाळूचोरी रोखण्यासाठी तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर यांनी एक पथक तयार केले आहे. या पथकामध्ये मंडळ अधिकारी संतोष सुरवसे, तलाठी अप्पासाहेब काळेल, तलाठी प्रकाश गुजले, कोतवाल महादेव बंडगर यांचा समावेश आहे.
नेपतगाव येथील माण नदीमधून १ ब्रास वाळू उपसा करून बिगर नंबरच्या वाहनातून वाहतूक करताना महसूलच्या पथकाने पकडले आहे. त्याचबरोबर सरकोली येथील भीमा नदीच्या पात्रातून अर्धा ब्रास वाळू उपसा करून एमएच-१० एस-२८५४ या वाहनामध्ये वाहतूक होती. ते वाहन जप्त केले आहे. भटुंबरे गावच्या हद्दीतील स्मशानभूमीजवळील भीमा नदीपात्रात २८ हजार रुपये किमतीची ७ ब्रास वाळू बेकायदेशीरपणे उत्खनन करून साठा केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.