शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अजनसोंड येथील बोगस डॉक्टरवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 14:45 IST

पंढरपूर : वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्य व जीवितास धोका असलेल्या बोगस डॉक्टरला पोलिस व वैद्यकीय पथकाने रंगेहात पकडले आहे. अजनसोंड (ता पंढरपूर) येथील सुमन कुमार रबिन मंडळ यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आले आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ प्रभाकर बोधले, गटविकास अधिकारी ...

ठळक मुद्दे- पंढरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल- रूग्णालयात प्रमाणपत्र दिसून आले नाही- पंढरपूर तालुक्यात अवैध डॉक्टरांचा सुळसुळाट

पंढरपूर : वैद्यकीय ज्ञान व कायदेशीर पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून जनतेच्या आरोग्य व जीवितास धोका असलेल्या बोगस डॉक्टरला पोलिस व वैद्यकीय पथकाने रंगेहात पकडले आहे. अजनसोंड (ता पंढरपूर) येथील सुमन कुमार रबिन मंडळ यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास करण्यात आले आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ प्रभाकर बोधले, गटविकास अधिकारी आर. एस घोडके, पी आर जावळे, व्ही आर रणदीवे, एस जी डोके असे सर्व मिळुन पंचायत समिती आॅफीस कामकाज आटपून बोगस डॉक्टरचा शोध घेण्याकरीता निघाले. अजनसोंड (ता. पंढरपूर) येथे आलेवर त्यांना एक बोगस डॉक्टर मिळुन आला. त्या अवैधरित्या वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या इसमाचे नाव सुमन कुमार रबिन मंडळ असे आढळून आले.

 अजणसोंड येथील सुभाष श्रीरंग चव्हाण यांच्या जागेत वैद्यकीय व्यवसाय मागील तीन वर्षांपासून करत होते.  त्यांच्या त्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र दर्शनी बाजूस लावलेली दिसून आले नाही. यामुळे पोलिसांनी त्यांच्याकडे प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची मागणी केली. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबत कोणतीच परवानगी नव्हती त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोनी धनंजय जाधव यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरdocterडॉक्टरhospitalहॉस्पिटलMedicalवैद्यकीयHealthआरोग्यSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद