शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला डबलसीट घेऊन जाणाºयावर कारवाई; सोलापूर शहर पोलिसांवर का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 11:59 IST

सोलापूरकरांचा भाबडा प्रश्न: सर्वसामान्यांवर कारवाई करणारे स्वत: मात्र बिनधास्त नियम मोडताना दिसतात

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशावरून सोलापूर शहरात दि. २३ मार्चपासून संचारबंदीतब्बल तीन महिन्यानंतर संचारबंदी शिथिल करण्यात आली, मात्र शहरवासीयांना नियम घालून देण्यात आले आदेशानुसार सध्या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली जात आहे

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने लावण्यात आलेल्या नाकाबंदी दरम्यान डबलसीट प्रवास करणाºया मोटरसायकलस्वारावर कारवाई केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी नर्स पत्नीला सोडण्यासाठी जाणाºया पतीवर कारवाई झाली; मात्र कारवाई करणारे पोलिसच जर नियम तोडत असतील तर त्यांना सूट का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडत आहे. 

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाच्या आदेशावरून सोलापूर शहरात दि. २३ मार्चपासून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती. तब्बल तीन महिन्यानंतर संचारबंदी शिथिल करण्यात आली, मात्र शहरवासीयांना नियम घालून देण्यात आले आहेत. शहरात वाहतुकीला परवानगी देण्यात आली आहे. दुचाकीवरून फक्त एक व्यक्ती, रिक्षातून २ व एक चालक, मोटार कारमध्येही चालकासह दोन तर मोठ्या कारमधून चार लोकांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आदेशानुसार सध्या नाकाबंदी दरम्यान वाहनांची तपासणी केली जात आहे. 

फौजदार चावडी पोलीस ठाणे, जेलरोड पोलीस ठाणे, सदर बझार पोलीस ठाणे, विजापूर नाका पोलीस ठाणे, सलगर वस्ती पोलीस ठाणे, एमआयडीसी पोलीस ठाणे, जोडभावी पेठ पोलीस ठाणे या सात पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शहरात प्रवेश करणाºया मार्गांवर विशेष नाकाबंदी लावण्यात आली आहे. शिवाय शहरातील मुख्य चौक असलेल्या सात रस्ता व अन्य ठिकाणीही नाकाबंदी केली जात आहे. २९ जून रोजी सकाळच्या सुमारास सात रस्ता येथे नर्स पत्नीला हॉस्पिटलला सोडण्यासाठी जाणाºया पतीवर डबलसीटची कारवाई करण्यात आली होती. आठ दिवसातील दुसºया कारवाईमुळे नर्सच्या पतीने दररोज पत्नीला कामाला सोडण्यासाठी व आणण्यासाठी जावे लागते. त्यामुळे परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज पोलीस आयुक्तालयात देण्याचा प्रयत्न केला होता; मात्र नियमाने अशी परवानगी देता येत नसल्याचे आयुक्तालयात सांगण्यात आल्यामुळे नर्सचे पती निराश होऊन घरी परतले. 

 एकीकडे डबलसीटची कारवाई केली जात असताना जे कर्मचारी नाकाबंदी दरम्यान वाहने अडवतात व कारवाई करतात तेच आपली ड्यूटी झाल्यानंतर मोटरसायकलवरून डबलसीट निघून जातात. तर बहुतांश पोलीस कर्मचारी शहरात डबलसीट फिरताना दिसतात. कारवाई करणाºया पोलिसांकडूनच फिजिकल डिस्टन्सचा नियम मोडताना सर्रासपणे दिसते. हा प्रकार पाहून सर्वसामान्य  प्रवाशांना प्रश्न पडतो की जो नियम आम्हाला लागू करण्यात आला आहे, तो या पोलीस कर्मचाºयांना नाही का? 

अंमलबजावणी करणाºयांनीही नियम पाळावेतनाकाबंदी दरम्यान डबलसीटवर कारवाई केली जाते.  वास्तविक पाहता पुरुष आणि स्त्री असेल तर ते पती-पत्नी, भाऊ-बहीण, आई-मुलगा असे कोणीही असू शकतात. शेवटी हे लोक एकाच घरातील असतात त्यांना अडवून कारवाई करणे कितपत योग्य आहे. शासनाचा आदेश आहे तर मग त्याची अंमलबजावणी करणाºया पोलिसांनी स्वत: प्रथमत: नियमाचे पालन केले पाहिजे, असे मत शहरातील प्रवासी नागरिकांनी ‘लोकमत’समोर मांडले. 

पोलीस आयुक्तांनी याकडेही लक्ष द्यावे

  • - सध्या नाकाबंदी दरम्यान नियमानुसार वाहन चालकावर कारवाईचे सत्र सुरू आहे. 
  • - जे पोलीस कर्मचारी कारवाई करतात त्यांनी स्वत: नियम तोडला तर त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे. पोलीस आयुक्तांनी याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा दंड झालेल्या प्रवासी नागरिकांमधून होत आहे. 
टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी