शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खोमनाळ येथील जुगार अड्ड्यावर कारवाई, पाच जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:28 IST

सोलापूर : खेमनाळ (_ता़ मंगळवेढा) गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळया जागेत सुरू असलेल्या जुगार पोलीसांनी छापा टाकला़ या छाप्यात पोलीसांनी ८४ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना ...

ठळक मुद्दे- खेमनाळ गावाजवळील ढेंम्बरे वस्तीजवळ टाकली धाड- सोलापूर ग्रामीण पोलीसांची कारवाई- पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांच्या विशेष टिमचा सहभाग

सोलापूर : खेमनाळ (_ता़ मंगळवेढा) गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळया जागेत सुरू असलेल्या जुगार पोलीसांनी छापा टाकला़ या छाप्यात पोलीसांनी ८४ हजार ७०० रूपयांच्या मुद्देमालासह पाच जणांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यावर कारवाई करण्याकामी मंगळवेढा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खेमनाळ गावातील ढेंम्बरे वस्तीवरील कॅनॉलजवळ मोकळ्या जागेत रात्री पत्राशेड शेजारी सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकला.

यावेळी पोलीसांनी रामचंद्र गेना सावजी  (रा मंगळवेढा), रोहित सिद्धेश्वर इंगले (रा. खोमनाळे, मंगळवेढा), दत्तात्रय वसंत बीरे, (खोमनाळे), बाळासो सौदागर ढेम्बरे (रा खोमनाळे,मंगळवेढा), प्रभाकर सौदाकर इंगळे  (रा, खोमनाळे ता मंगळवेढा) यांना ताब्यात घेतले़ याचवेळी त्यांच्याकडील जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, वाहने असा ८४ हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी पाच जणांविरूध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदशनाखाली विशेष टीम मधील पोनि सुधाकर कोरे, पोसइ ए. एस. तांबे, पोसइ डी. एस. दळवी, पो.कॉ.अमोल पाटील, कोंडीबा मोरे, योगेश येवले, मयूर कदम, रविराज गटकूळ, चालक आनंद डीगे यांच्या टिमने केली़

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी