नियम धाब्यावर.. कुर्डूवाडीत ६२ दुचाकींवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:19 IST2020-12-08T04:19:50+5:302020-12-08T04:19:50+5:30
त्यामुळे परिसरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या दुचाकी प्रवासावर दणका बसला आहे. ही कारवाई दररोज केली गेली तर त्यावर चांगलाच आळा ...

नियम धाब्यावर.. कुर्डूवाडीत ६२ दुचाकींवर कारवाई
त्यामुळे परिसरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या दुचाकी प्रवासावर दणका बसला आहे. ही कारवाई दररोज केली गेली तर त्यावर चांगलाच आळा बसणार आहे.
कुर्डूवाडी शहर व परिसरात नेहमी दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. त्यात अनेक वाहनचालक हे बेकायदेशीरपणे या भागात वागताना दिसतात.यावर कुर्डूवाडी वाहतूक पोलिसांनी गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याची धडक मोहीम पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे,सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केली आहे.
त्यात त्यांच्याकडून आतापर्यंत ६२ दुचाकीवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वाघमारे, हवालदार साधू जगदाळे,महिला पोलीस नाईक एफ.एस. कस्तुरे,पोलीस शिपाई सागर सुरवसे,चालक हवालदार ललित शिंदे, होमगार्ड सागर काळे,नरहरी नवगिरे, सोमा करंडे यांनी केली.
............
कोट-
कुर्डूवाडी शहरात व परिसरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने ही संबंधित चालकांकडून बेकायदेशीरपणे विना लायसन,विना मास्क यासह शासनाचे कोणतेही नियम न पाळता वापरात आहेत.त्यांच्यावर अंकुश असावा म्हणून कारवाई सुरू केली असून कोणीही वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवू नयेत,अन्यथा यापेक्षा कडक कारवाई केली जाईल.
- रवींद्र डोंगरे, पोलीस निरीक्षक,कुर्डूवाडी
.........
फोटो ओळ-०७कुर्डूवाडी-ॲक्शन
कुर्डूवाडी शहरात मास्क न वापरणे व लायसन जवळ न बाळगणाऱ्या दुचाकीवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांचे पथक.