शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दरोडा, विनयभंग, घरफोडी अन् जबरी चोरीतील संशयित आरोपी जेरबंद; करमाळा पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 12:55 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

करमाळा : विनयभंग, दरोडा, घरफोडी व जबरी चोरी असे वेगवेगळे गुन्हे दाखल असलेला संशयित आरोपी पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे.बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार असे पकडलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो ४० वर्षाचा असून आवाटी येथील राहणार आहे.

संशयित आरोपी बंडू ऊर्फ बंड्या होनाजी उर्फ होन्या पवार याच्यावर करमाळा, कुर्डुवाडी व दौड रेल्वे पोलिसात गुन्हे दाखल आहेत. संशयित आरोपी हा चोऱ्या करून फरार होताहोता. त्याच्यावर करमाळा पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. ३९५, ३५४ व ३२४ या कलमांतर्गत हे गुन्हे दाखल झालेले आहेत.कुर्डुवाडी पोलिसात एक गुन्हा दाखल असून ३९४ व ३९७ या कलमांतर्गत हा गुन्हा दाखल झालेले आहे. तर दौड रेल्वे पोलिसात ३७९ या कलमांतर्गत त्याच्याविरुद्ध तीन गुन्हे दाखल आहेत.

संशयित आरोपीवर २००४ पासून २०१९ दरम्यान सहा गुन्हे दाखल झालेले आहेत. तेव्हापासून तो फरार होता. पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर पोलिसांना त्याला पकडण्यात यश आले आहे. करमाळ्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांना पवारबद्दल माहिती मिळाली त्यानंतर पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे,अप्पर पोलिस अधिक्षक हिंमत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. यासाठी तौफिक काझी, महिला पोलिस शितल पवार, गणेश खोटे आदींनी कामगिरी केली.

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीस