फोंडशिरस दरोड्यातील आरोपी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:58+5:302021-04-27T04:22:58+5:30

ही कामगिरी नातेपुते सहा. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हेडकॉ अनिल गडदे, पोना मसाजी थोरात, नवनाथ माने, तुषार गाडे, ...

Accused of Fondashiras robbery arrested | फोंडशिरस दरोड्यातील आरोपी जेरबंद

फोंडशिरस दरोड्यातील आरोपी जेरबंद

ही कामगिरी नातेपुते सहा. पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर, पोलीस हेडकॉ अनिल गडदे, पोना मसाजी थोरात, नवनाथ माने, तुषार गाडे, पोकॉ अजित कडाळे, अमित जाधव, विश्वास जानकर, विशाल घाडगे, शाहू काळदाते, सायबर शाखेचे पोकॉ अन्वर आत्तार यांनी केली आहे. खोरोची येथील सचिन पोपट जाधव हा फोंडशिरस भागात वारंवार येऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने तो काही कामधंदा करीत नसून पैशाची उधळपट्टी करीत असल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस करून पोलिसी खाक्या दाखविताच फोंडशिरस येथील घरफोडी मी व तुषार दादासोा चव्हाण (फोंडशिरस), सूरज फासगे (वडापुरी), मदन काळे (शेटफळ), कुमार कांबळे (वरकुटे), दादा बोडरे (मारकडवाडी), संदीप बोडरे (उंबरे दहिगाव) असे आम्ही सर्वांनी केली असल्याचे कबूल केले.

याबाबत अधिक तपासात फोंडशिरस येथून तुषार चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता सदर गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असल्याची त्याने कबुली दिली. यानंतर सदर गुन्ह्यातील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन माळशिरस न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने सर्व आरोपींना पोलीस कोठडी ठोठावली आहे.

Web Title: Accused of Fondashiras robbery arrested