दोन वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:56 IST2021-01-13T04:56:53+5:302021-01-13T04:56:53+5:30
पुळूज (ता. पंढरपूर) येथील काही लोक डीजे व बँजोचे जुने साहित्य विक्री करण्याबाबत सोशल मीडियावर जाहिरात करत होते. ही ...

दोन वर्षांपासून फरार असलेल्या मोक्का गुन्ह्यातील आरोपीला अटक
पुळूज (ता. पंढरपूर) येथील काही लोक डीजे व बँजोचे जुने साहित्य विक्री करण्याबाबत सोशल मीडियावर जाहिरात करत होते. ही जाहिरात पाहून संबंधित व्यावसायिक त्यांना फोनद्वारे संपर्क साधत होते. यावेळी पुळूज येथील काही लोकांनी आमचा डीजे व बँजोचा व्यवसाय सध्या बंद आहे. यामुळे कमी किमतीत विकत देतो, म्हणून संंबंधित व्यक्तींना बोलावून घेतले. आलेल्या व्यावसायिकांना त्यांनी तलवार, चाकू, भाला, कुऱ्हाडी व अन्य शस्त्राचा धाक दाखवून सोने, पैसे व मोबाईलची लूट केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील काही जणांना पकडण्यात आले होते; परंतु मंजा माणिक पवार (रा. पुळुज, ता. पंढरपूर) हा या व अन्य गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा होता. त्याच्यावर मोक्का व संघटित गुन्हेगारीसंदर्भात कारवाई केली होती.
मंजा माणिक पवार याला पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
दोन महिन्यांपूर्वी साथीदार अटकेत
डॉल्बीचे साहित्य शत्रुघ्न अनंता काळे याने चोरी केले होते. त्या डॉल्बीच्या साहित्याचे फोटो सोशल मीडियावर टाकून ते कमी दरात विक्री करण्याबाबत आवाहन करत होता. हे साहित्य खरेदीसाठी आलेल्या लोकांना हत्यारांचा धाक दाखवून पैसे व मोबाईल काढून घेण्याचे प्रकार शत्रुघ्न काळे व मंजा माणिक पवार यांनी केले. याबाबत त्यांच्या विरुद्ध मे २०१९ मध्ये तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाईही केली. त्याला नोव्हेंबर महिन्यात अटक केली आहे, तर या गुन्ह्यातील सचिन किरण काळे, मिथुन ऊर्फ पंढरी किरण काळे हे फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी सांगितले.
फोटो :::::::::::::::::::::::
१२मंजा पवार