शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

काळभैरवनाथचे दर्शन घेऊन निघालेल्या फर्निचर व्यवसायिकाचा सोलापुरात अपघाती मृत्यू

By काशिनाथ वाघमारे | Updated: April 8, 2024 15:42 IST

कृष्णा प्रल्हाद सुतार असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव

काशिनाथ वाघमारे, सोलापूर: परांडा तालुक्यात सोनारी येथील काळभैरवनाथ देवाचे दर्शन करून घरी दुचाकीवरून येत असताना लव्हे (ता.माढा) शिवारात अनोळखी वाहनाच्या धडकेने माढ्यातील फर्निचर व्यवसायिकाचा मृत्यू झाला. कृष्णा प्रल्हाद सुतार (वय ५७, रा. माढा) असे अपघातात मरण पावलेल्या फर्निचर व्यवसायिकाचे नाव असून हा अपघात ७ एप्रिल रोजी रात्री १०.१० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबत नामदेव जालिंदर सुतार (रा.सापटणे भोसे ता.माढा) यांनी फिर्याद दिली असून अनोळखी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातात मयत झालेले कृष्णा सुतार हे सोनारी येथे काळभैरवनाथ देवाचे दर्शन करून माघारी मोटरसायकल (एम.एच. ४५ / वाय. ८२२३) वरून माढ्याकडे येत होते. परांडा-कुर्डूवाडी रस्त्यावरून येत असताना लव्हे शिवारातील मिलिंद गायकवाड यांच्या शेताजवळ रस्त्यावर त्यांना समोरून येणाऱ्या एका अनोळखी वाहनाने धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास जबर मार लागून जखमी झाले. त्यांची मोटरसायकल रस्त्याच्या बाजूला पडली. जखमी अवस्थेत त्यांना कुर्डूवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे आहेत.

टॅग्स :Deathमृत्यूSolapurसोलापूर